नंदुरबार | प्रतिनिधी
रोटरी क्लब नंदुरबार चा पदग्रहण सोहळा समारंभ संपन्न झाला असून नूतन अध्यक्ष म्हणून आर्किटेक्ट नीरज देशपांडे तर सचिव म्हणून डॉ. जयंती देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे
रोटरी क्लब ऑफ नंदुरबारच्या पदग्रहण समारंभ शनिवारी अहिंसा इंटरनॅशनल स्कूल येथे घेण्यात आला पदग्रहण अधिकारी म्हणून रोटरी इंटरनॅशनल चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संतोष प्रधान व सूनेत्रा प्रधान हे उपस्थित होते असिस्टंट गव्हर्नर रवींद्र पाटील, अहिंसा फाऊंडेशनचे चेअरमन राजेश मुनोत ,यशवंत स्वर्गे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते .मावळते अध्यक्ष पंकज पाठक यांच्याकडून नीरज देशपांडे यांनी अध्यक्षपदाच्या तर जयंती देशपांडे यांनी सचिव पदाच्या पदभार स्वीकारला
यावेळी संचालक मंडळावर हिरालाल महाजन, दिनेश वाडीले, विलास दाणेज ,नेहा गुजराती, रोहित केतकर, छाया कोडग, राजेंद्र कासार, निलेश देसाई, हितेश सुगंधी ,अनिल पाटील यांनीही पदभार स्वीकारला
तसेच नुतन जिल्हाधिकारी मनीषा खात्री यांनी देखील आधीच रोटरी क्लब ऑफ नंदुरबार चे मानद सदस्यत्व स्वीकारले आहे .प्राचार्य डॉ एन डी चौधरी , डॉ रोशन भंडारी, डॉ. शिल्पा भंडारी ,संतोष नानकांनी, सुशिल पंडित, डॉ. रोहन शाह ,रणजित राजपूत ,मुकेश सूर्यवंशी ,नीलेश सोनार प्रीती सोनार, सुवर्णा सोनार ,संदीप श्रॉफ, रोहिणी श्रॉफ, मयूर शहा यांचे सदस्यत्व स्वीकारून रोटरी क्लबच्या वतीने स्वागत करण्यात आले.
संतोष प्रधान यांनी समाजाला आपल्याकडून काय फायदा झाला ते महत्वाचे आहे समजासाठी रोटरी क्लबच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम सर्वांनी मिळून एकत्रित राबवावे असे आवाहन केले आहे
नीरज देशपांडे यांनी आपल्या मनोगतात वर्षभरात विविध समाजोपयोगी उपक्रम आपल्या सर्वांच्या सहकार्याने राबविण्यात येणार असल्याचे सांगितले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल अग्रवाल यांनी केले माधुरी पाठक यांनी फोर वे टेस्टचे वाचन केले जयंती देशपांडे यांनी आभार मानले. कोरोनाच्या नियमांचे पालन म्हणून केवळ रोटेरियन्सच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.