नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्हयात दि.१८ जानेवारी मंगळवार रोजी तब्बल 288 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे.तर १०० जण कोरोनामुक्त झाले आहेत.
नंदूरबार जिल्हयात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. जिल्ह्यात दि.18 जानेवारी रोजी दिवसभरात 288 कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. यात नंदूरबार तालुक्यात 144 , तळोदा 15 , शहादा 92, अक्कलकुवा तालुक्यात 18 ,नवापूर तालुक्यात 17, तर बाहेर जिल्ह्यातील 2 जणांचा समावेश आहे.सध्या जिल्ह्यात 952 कोरोनाचे ॲक्टीव रुग्ण आहेत.
दरम्यान आज नंदूरबार जिल्ह्यात 100 जण कोरोनामुक्त झाले आहेत.यात नंदूरबार तालुका 50, तळोदा 17 , शहादा 12 , नवापूर तालुक्यात 19 तर अक्कलकुवा व धडगाव तालुक्यात प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.नंदूरबार जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढू नये यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच लसीकरण करून घ्यावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.








