नवापूर l प्रतिनिधी
नवापूर शहरात एक ४ वर्षाचा अनाथ बालक बसस्थानक परिसरात वास्तव्यास होता.अनेकांच्या सहकार्यांने त्याचा पालन पोषण होत होते.अखेर पोलीसांच्या मदतीने त्या बालकाला नविन कपडे देत बालकाला नंदुरबार बालकल्याण समितीकडे सोपवले असुन त्या बालकाला शिशुगृह धुळे येथे पाठविण्यात येणार आहे.बालकाला पाठवितांना मात्र सगळ्यांचे डोळे पाणावले.

नवापूर शहरात मागील ८ महिण्यांपासुन एक ४ वर्षाच्या बालक बसस्थानक परिसरात राहत होता.या ४ वर्षाच्या बालकाचे आई व वडील मयत झाले असल्याची माहिती चहाचा व्यवसाय करणारे राहुल विजय चौधरी, अंडे विक्रेते सुनिल रमेश पाटील, पटेल केक शॉपचे मालक विशाल हर्षदभाई प्रजापती यांनी दिली.चालक संदिप पंकज मावची यांचा घरी ४ महिने बालक राहीला या नंतर तो बसस्थानक परिसरात राहत होता.रात्रीचे जेवण व पालन पोषण राहुल चौधरी, सुनिल पाटील,विशाल प्रजापत हे करत होते. हे चित्र नवापूर उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ.कुंदन बेंद्रे व आस्था हॉस्पीटलचे डॉ.चंद्रशेखर पाटील यांनी पाहीले त्यांना राहुल चौधरी यांनी सविस्तर माहीती दिली. नवापूर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ यांना डॉ.कुंदन ब्रेद्रे यांनी त्या बालकाबद्दल माहिती दिली.त्यानंतर पोलिस निरीक्षक निलेश वाघ यांनी बालकल्याण समिती नंदुरबार यांचाशी संपर्क करुन या बद्दल माहिती दिली.बालकल्याण समितीचे एक कर्मचारी यांनी नवापूर पोलिस स्टेशन येथे येऊन सर्व प्रोसेस करुन त्या बालकाला नंदुरबार बालकल्याण समितीकडे सोपवले. ही समिती त्यांची प्रोसेस करुन त्या बालकास शिशुगृह धुळे येथे पाठविणार आहे. पोलिस,डॉक्टर, बसस्थानक परिसरातील दुकानदार यांनी एक माणुसकीचे दर्शन घडविले आहे.नवापूर हुन रवाना करतांना त्या मुलाला राहुल चौधरी यांनी नविन कपडे परिधान केले तर डॉ.चंद्रशेखर पाटील यांनी बुट ,मोजे, तोंडाला लावायला मास्क आणुन दिले तर पटेल केकचे मालक हर्षद प्रजापती यांनी त्यांचा स्वताच्या वाहनाने त्या बालकाला नंदुरबार बालकल्यान समिती नंदुरबार येथे पाठविले. यावेळी सर्वजण भावुक झाले होते.








