Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर तालुक्यात वनविभागाचे छापे पावणे दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत, दोघांविरुद्ध वनगुन्हे

team by team
January 15, 2022
in क्राईम
0
नवापूर तालुक्यात  वनविभागाचे छापे पावणे दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत, दोघांविरुद्ध वनगुन्हे

नवापूर l प्रतिनिधी
नवापूर शहरासह तालुक्यात वनविभागाने दोन ठिकाणी छापे टाकून अवैध तोडीच्या सागवानी, सिसम जातीच्या चौपाट असा सुमारे 1 लाख 80 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध वनगुन्हे दाखल करण्यात आला आहे.
नवापूर शहरातील भारत फर्निचर मार्ट येथे सागवानी व सिसम जातीच्या लाकडांचे 36 नग अवैध चौपाट आढळून आले. या लाकडाची किंमत दीड लाख रुपये आहे. याबाबत वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदुरबार येथील सहाय्यक वनसंरक्षकांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून नवापूर वनक्षेत्रपाल व कर्मचारी तसेच व चिंचपाडा प्रादेशिकसह कर्मचार्‍यांनी नवापूर शहरातील आसद अब्बास कुरेशी यांच्या भारत फर्निचर मार्ट येथे जाऊन त्यांच्या फर्निचर मार्टची सर्च वॉरंटने झडती घेतली असता तेथे कुर्‍हाडीने घडतळ केलेले साग चौपट नग 23 व सिसम 13 चौपाट नग असे एकूण 36 नग मिळून आले. सदर मालाची बाजार भावानुसार अंदाजीत किंमत दीड लाख रुपये आहे.
या सदर कारवाईत सहाय्यक वनसंरक्षक धनंजय पवार प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार, श्रीमती स्नेहल अवसरमल वनक्षेत्रपाल नवापूर प्रादेशिक भिवाजी दराडे, वनपाल खेकडा, ए.एम शेख वनपाल बोरझर, सुनिता पाटील वनपाल वडकळंबी, वनरक्षक कल्पेश अहिरे, कमलेश वसावे, संतोष गायकवाड, विकास शिंदे, अशोक पावरा गिरीश वळवी, सुनिता बडगुजर, भाग्यश्री पावरा, तुषार नांद्रे, रामदास पावरा, संजय बडगुजर आशुतोष पावरा वाहन चालक साहेबराव तुंगार, दिलीप गुरव, वनमजूर छगन सोनवणे बाळा गावित, फिलिप गावित यांनी सहभाग भाग घेतला.
चिचलीपाडा
शनिवारी रोजी सहाय्यक वनसंरक्षक नंदुरबार यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून त्यांच्यासह वनक्षेत्र स्टाफ चिंचपाडा प्रा.नवापूर प्रादेशिक यांचे सह चिचलीपाडा गावात जाऊन दिनेश बिजला गावित रा.चिचलीपाडा याच्या घराची सर्च वॉरंटने झडती घेतली असता त्यांच्या राहत्या घराच्या पडसाळीत कुर्‍हाडीने घडतळ केलेले साग चौपट नग 18 व तयार पलंग नग 1 मिळून आले.
सदर मालाची बाजार भावानुसार अंदाजीत किंमत 30 हजार रुपये आहे. सदर कारवाईत सहाय्यक वनसंरक्षक धनंजय पवार, वनरक्षक संतोष गायकवाड, विकास शिंदे, तुषार नांद्रे, संजय बडगुजर, रामदास पावरा, आशुतोष पावरा, वाहन चालक साहेबराव तुंगार, रोपवन रखवालदार बाळा गावीत यांनी सहभाग घेतला.

बातमी शेअर करा
Previous Post

फत्तेपूर शिवारातून अवैध मद्यासह २९ लाखांचा मुद्देमाल जप्त,तिघांना अटक

Next Post

अमळथे येथील युवकाचा मृत्यू प्रकरणी महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ व ऑपरेटर निलंबीत

Next Post

अमळथे येथील युवकाचा मृत्यू प्रकरणी महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ व ऑपरेटर निलंबीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम,  शाळेचा १०० टक्के निकाल

के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम, शाळेचा १०० टक्के निकाल

May 9, 2026
एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

May 9, 2026
दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

May 9, 2026
खाजगी ट्रॅव्हल्स चालकांकडून होणारी प्रवाश्यांची आर्थिक लुट थांबवा- हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी

खाजगी ट्रॅव्हल्स चालकांकडून होणारी प्रवाश्यांची आर्थिक लुट थांबवा- हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी

May 8, 2026
जिल्हा रुग्णालयात प्रथमच ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’चे यशस्वी निदान

जिल्हा रुग्णालयात प्रथमच ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’चे यशस्वी निदान

May 8, 2026
कोळदा-धनराट रस्त्यावर अवैध दारूसह २६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

कोळदा-धनराट रस्त्यावर अवैध दारूसह २६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

May 8, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add