नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्हयात आज दि.१५ जानेवारी रोजी तालुक्यात तब्बल १७२ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे.दरम्यान जिल्ह्यात ५ दिवसात ५८७ कोरोना रुग्ण आढळले आहेत.
नंदूरबार जिल्हयात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. जिल्ह्यात आज दि.१५ जानेवारी रोजी दिवसभरात १७२ कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. यात नंदूरबार तालुक्यात ९३ , तळोदा १८ , शहादा १२, अक्कलकुवा तालुक्यात १० ,नवापूर तालुक्यात ३६, धडगाव तालुक्यात १ तर बाहेर जिल्ह्यातील २ जणांचा समावेश आहे.
नंदूरबार जिल्ह्यातील गेल्या पाच दिवसात ५८७ कोरोना रुग्ण आढळले आहेत.यात दि.११ रोजी ७७, दि.१२ रोजी ९४,दि.१४ रोजी ९५, दि.१४ रोजी १४९ तर आज दि.१५ रोजी १७२ कोरोना रुग्ण आढळले आहेत. नंदूरबार जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढू नये यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच लसीकरण करून घ्यावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.








