म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील मलोणी येथील एस. ए. मिशन मराठी प्राथमिक शाळेत राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मुख्याध्यापक प्रल्हाद राजभोज यांचे हस्ते प्रथम प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.
राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्त व महिला सन्मान अभियान दिनांक ३ ते १२ जानेवारी २०२१ अंतर्गत शाळेत रांगोळी स्पर्धा, निबंध लेखन, चित्रकला,वाचन प्रकल्प इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.इयत्ता पहिली ते चौथी च्या विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल सोमवंशी सहसंचालन नितिन गलराह यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी उषा जाधव,मंगला पाटील, भारती शेवाळे, रविकांता वसावे, कुणाल सोमवंशी, सोनाली पाकळे, नितिन गलराह व अर्चना चर्वतूर यांनी परिश्रम घेतले.








