Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रतिबंधित नॉयलान मांजा विक्री करणार्‍या एकाविरुध्द गुन्हा दाखल नंदुरबार शहर पोलिसांची कारवाई; 3300 रुपयांचा नॉयलान मांजा जप्त

team by team
January 12, 2022
in क्राईम
0
नंदूरबार येथे पोलिसांनी जप्त केला नायलॉन मांजा एकाविरुद्ध गुन्हा दाखल

नंदुरबार l प्रतिनिधी
मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर शासनाने वापर व विक्रीस प्रतिबंध घातलेला नायलॉन मांजा विक्री करतांना एकाला पकडुन 3300 रुपयांचा नॉयलान मांजा जप्त करण्यात आला आहे आहे. मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहर पोलिसांनी ही पहिली कारवाई केली असून नॉयलॉन मांजा विक्री करणार्‍यांवर पोलिस नजर ठेवुन आहेत.
मकरसंक्रांतीला पतंग उडविण्यासाठी अनेकांकडून नॉयलान मांजाची विक्री व वापर होतो. परंतु नॉयलान मांजा नागरीकांसह पशुपक्षींच्या जिवितासाठी धोकेदायक असल्याने जिल्हा प्रशासनाने आदेश जारी करुन नॉयलान मांजा विक्री व वापरास देखील प्रतिबंध केल्याचे आदेश जारी केले आहे. नंदुरबार शहर पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना गुप्त माहिती मिळाली की, नंदुरबार शहरातील जळका बाजार परिसरात एक इसम नॉयलान मांजा विक्री करीत आहे. त्या माहितीच्या आधारे नंदुरबार शहर पोलीस कर्मचार्‍यांच्या पथकाने त्याठिकाणी जावुन पाहणी केली असता जळका बाजार परिसरातील धान्य दुकानाचा ओटावर एक इसम काळी रंगाची थैली घेवुन प्रतिबंदी असलेला नॉयलान मांजा विक्री करतांना मिळून आला. त्यास पोलिसांनी ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने प्रकाश शामराव छत्रिय रा. चौधरी गल्ली, नंदुरबार असे नाव सांगितले. त्याच्याकडून 1600 रुपये किंमतीचे मोनोकिट नॉयलान मांजा प्लाटीक कोटींग असलेला दोन मोठे नग प्रत्येकी 800 रुपये किंमतीप्रमाणे, 400 रुपये किंमतीचा एक नगनॉयलान मांजा, 600 रुपये किंमतीचा नॉयलान मांजा असलेले 2 लहान नग प्रत्येकी 300रुपये किंमतीचे, व 300 रुपये व 400 रुपये किंमतीची 2 लागडी चक्री सुरती मांजा नाव असलेला नॉयलान मांजा असा एकुण 3300 रुपये किंमतीचा नॉयलान मांजा जप्त करण्यात आला आहे. याबाबत पोकॉ.श्रीकांत पाटील यांनी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रकाश शामराव छत्रीय रा. चौधरी गल्ली नंदुरबार याच्याविरुध्द भादंवि कलम 336 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई ही सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माळी, पोहकॉ. जगदीश पवार,पोहेका सुनील मोरे, पोना. श्रीकांत माळी, पोकॉ.शैलेंद्र माळी, पोकॉ.श्रीकांत पाटील, पोकॉ.विजय नागोडे, पोकॉ.राहुल पांढारकर, पोकॉ.विशाल मराठे यांच्या पथकाने केली.

बातमी शेअर करा
Previous Post

दुधाळ जनावराचे गट वाटपासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Next Post

नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे विना मास्क फिरणाऱ्या ४६४ जणांवर,१२ व्यवसायीकांविरुध्द् , रात्री दुकाने उघडे ठेवणाऱ्या ५ जणांवर गुन्हे दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add