नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर शहराबाहेरील जुना आरटीओ नाक्याजवळ राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर भरधाव आयशरने चारचाकी वाहनाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात वाहन चालक ठार तर एकास दुखापत झाली आहे. याप्रकरणी आयशर चालकाविरूद्ध नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यााबबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर शहराबाहेरील राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरचारचाकी वाहनाने (जी.जे.१६ एपी ६९३२) सुरतहून यवतमाळकडे भगतगिरी प्रेमगिरी गोस्वामी (वय ३६ ) रा.विदर्श हौसिंग सोसायटी बाजरीया नगर, यवतमाळ), आकाश नंदनपूरी गोस्वामी (वय २८) रा.विदर्श हौसिंग सोसायटी, रेणूका मंगलम यवतमाळ हे जात होते .यावेळी सुरतकडे बन्सीलाल दुर्गाराम बिश्नोई रा.भिक्कम कौर ओसियन, जि.जोधपूर (राजस्थान ) याने त्याच्या ताब्यातील आयशर (क्र.डी.एन. ०९ एन ९०१२) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन जुना आरटीओ नाक्याजवळ भरधाव वेगात आयशर चालवून येत असतांना त्याने चारचाकी वाहनाला धडक दिल्याने अपघात घडला. या अपघातात भगतगिरी गोस्वामी हे ठार तर आकाश गोस्वामी यांना दुखापत झाली असून वाहनाचेही नुकसान झाले. याप्रकरणी आकाश गोस्वामी यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात बन्सीलाल बिश्नोई याच्याविरुद्ध भादंवि कलम ३०४(अ), २७९, ३३७, ३३८, मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४/१८७ प्रमारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ.युवराजसिंग परदेशी करीत आहेत.








