नंदुरबार | प्रतिनिधी-
नंदुरबार जिल्हयात दि. १० जानेवारी रोजी तालुक्यात ३६ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. दरम्यान नंदुरबार जिल्ह्यातील 6 जण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
नंदुरबार जिल्हयात दि.10 जानेवारी रोजी दिवसभरात ३६ कोरोना पॉझिटीव्ह आढळले. यात नंदुरबार तालुक्यात ३० शहादा तालुक्यातील 2 तर नवापूर येथे ३ तर तळोदा तालुक्यातील एकाचा समावेश आहे. नंदुरबार जिल्ह्यात सध्या 150 च्यावर कोरोना रुग्ण आहेत.त्यात नंदूरबार तालुक्यात सर्वाधिक रुग्ण असून त्यांनी शंभरी पर केली आहे.दरम्यान दि.10 जानेवारी रोजी जिल्ह्यातील 6 जण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.त्यानं नंदूरबार तालुक्यातील 5 तर नवापूर तालुक्यातील एकाचा समावेश आहे. नंदूरबार जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढू नये यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच लसीकरण करून घ्यावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.








