Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्हा साप्ताहिक वृत्तपत्र संघटनेची कार्यकारिणी गठीत,अध्यक्षपदी सतिष गोसावी तर उपाध्यक्षपदी दिलीप बडगुजर यांची निवड

team by team
January 10, 2022
in राजकीय
0
नंदुरबार जिल्हा साप्ताहिक वृत्तपत्र संघटनेची कार्यकारिणी गठीत,अध्यक्षपदी सतिष गोसावी तर उपाध्यक्षपदी दिलीप बडगुजर यांची निवड

नंदूरबार l प्रतिनिधी

नंदुरबार येथील नंदुरबार जिल्हा साप्ताहिक वृत्तपत्र संघटनेची जिल्हा कार्यकारिणी सर्वानुमते गठीत करण्यात आली. या संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सतिष रामगीर गोसावी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी दिलीप बडगुजर, सचिवपदी विशाल माळी, कार्याध्यक्षपदी जितेंद्र जाधव व कोषाध्यक्षपदी हंसराज चौधरी  यांची  निवड झाली आहे.
नंदुरबार शहरातील नेहरु नगरातील पत्रकार भवनात काल दि.9 जानेवारी 2022 रोजी नंदुरबार जिल्हा साप्ताहिक वृत्तपत्र संघटनेची बैठक घेण्यात आली. ही बैठक ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत पाठक, राजू पाटील, मावळते जिल्हाध्यक्ष हंसराज चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद आल्हाट, माजी नगरसेवक दिलीप बडगुजर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीच्या सुरुवातीला अनाथांची माय सिंधुताई सपकाळ व हेलिकॉप्टर अपघातातील जनरल स्व.बिपीन रावत व त्यांच्या शहीद सहकार्‍यांना सामुहिक श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी नंदुरबार जिल्हा साप्ताहिक वृत्तपत्र संघटनेच्या पदाधिकारी, सदस्यांनी आपापली मते व्यक्त करीत अडीअडचणी मांडल्या. साप्ताहिक वृत्तपत्र संघटना मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटने काम करावे. संघटनात्मक बांधणीतूनच साप्ताहिक वृत्तपत्रांच्या संपादक, पत्रकारांचे एकीकरण दिसेल, अशी मते  व्यक्त करण्यात आली. संघटनेचे मावळते जिल्हाध्यक्ष हंसराज चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद आल्हाट यांनी आपल्या कार्यकाळातील कामकाजाची माहिती दिली. त्यानंतर जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यात नंदुरबार जिल्हा साप्ताहिक वृत्तपत्र संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सतिष रामगीर गोसावी यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच जिल्हा उपाध्यक्षपदी दिलीप बडगुजर, सचिवपदी विशाल माळी, कार्याध्यक्षपदी जितेंद्र जाधव, कोषाध्यक्षपदी हंसराज चौधरी, सहसचिवपदी ज्ञानेश्वर गवळे, सहकोषाध्यक्षपदी विष्णु पाटील, सल्लागारपदी श्रीकांत पाठक, प्रसिध्दीप्रमुखपदी जगदिश ठाकूर, सदस्यपदी किशोर गवळी, दिपक सोनार, आफिक मिर्झा, सुभाष राजपूत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या बैठकीत नंदुरबार नगरपालिकेच्या स्विकृत नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल गजेंद्र शिंपी यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी धर्मेंद्र माळी, राजेंद्र पवार, प्रेमचंद राजपूत, मनोज समशेर, शैलेंद्र ईशी, सुबोध अहिरे, प्रविण चव्हाण, भरत चव्हाण, हिरालाल मराठे, भुषण देवकर, महादु हिरणवाळे, सुमानसिंग राजपूत, बापू ठाकरे, जगदिश सोनवणे, वैभव करवंदकर, आशिष चौधरी, प्रदिप गरुड, महेंद्र चौधरी, देविसिंग राजपूत, अशोक शिरसाठ, प्रशांत चौधरी, दिनेश सोनवणे आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

रोगराई पासून भावी पिढीला दूर ठेवायचे असेल शेतकऱ्यांनी विषमुक्त शेतीची कास धरा : गणेश आबासाहेब मोरे

Next Post

जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रासाठी प्रस्ताव सादर करावे

Next Post

जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रासाठी प्रस्ताव सादर करावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add