Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तिनसमाळसह नर्मदा काठांवरील गावांसाठी पाणी पुरवठा योजना प्रस्तावित करण्याच्या जि.प.अध्यक्षांच्या सूचना

team by team
January 10, 2022
in राजकीय
0
तिनसमाळसह नर्मदा काठांवरील गावांसाठी पाणी पुरवठा योजना प्रस्तावित करण्याच्या जि.प.अध्यक्षांच्या सूचना

नंदुरबार l प्रतिनिधी
गुजरात, महाराष्ट्र व मध्यप्रदेश अशा तीन राज्यांच्या सीमेवर असलेल्या धडगाव तालुक्यातील तिनसमाळ येथील रहिवाशांना तहान भागविण्यासाठी कसरत करावी लागत असल्याने जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी यांनी काल पायपीट करीत त्यांनी तिनसमाळ गाठले. यावेळी संबंधित पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ तिनसमाळसह नर्मदा काठांवरील गावांसाठी पाणी पुरवठा योजना प्रस्तावित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

धडगाव तालुक्यातील तिनसमाळमधील चारही पाड्यातील सुमारे ६०० रहिवाशांना पाण्यासाठी जिवघेणी कसरत करावी लागत आहे. सन २००८ पासून येथील रहिवासी पाणी मिळावे यासाठी प्रशासन दरबारी उंबरठे झिजवत आहेत. तर पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मात्र उंटावरुन शेळ्या हाकत कार्यालयातूनच येथील रहिवाशांना पाणी मिळाल्याचा दावा करीत आहेत. परिणामी येथील रहिवासी आजही तहानलेले असून त्यांचा पाणीप्रश्न सुटलेला नाही. जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी यांनी प्रत्यक्ष तिनसमाळला पायपीट करीत भेट दिली. सुमारे अडीच ते तीन कि.मी.अंतर पायी चालून सीमा वळवी यांनी तिनसमाळ गाठून तेथील रहिवाशांच्या समस्या जाणून घेतल्या.तिनसमाळच्या रहिवाशांना पाणी पुरवठा करण्यासाठी सोलरचे इस्टीमेट करण्यात आले होते. मात्र धुक्याच्या वातावरणात सदरची योजना फोल ठरत होती. तसेच तेथे विजेची देखील समस्या असल्याने लगतच्या गुजरात राज्याने नर्मदा काठावरील गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी राबविलेला पॅटर्न लक्षात घेवून पाणी पुरवठा योजना प्रस्तावित करण्याच्या सूचना ॲड.सीमा वळवी यांनी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तिनसमाळसह नर्मदा काठावरील सर्वच गावांसाठी पाणी पुरवठा करणारी योजना प्रस्तावित करुन कायमस्वरुपी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले. दरम्यान, जि.प.अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांनी तिनसमाळ येथे भेट देवून तेथील रहिवाशांच्या समस्या जाणून घेतल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. जि.प.अध्यक्षांच्या दौऱ्याने येथील रहिवाशांना आता पुन्हा एकदा पाणी मिळणार अशी आशा पल्लवित झाली आहे.
सदर दौऱ्याप्रसंगी समाजकल्याण सभापती रतन पाडवी, जि.प.सदस्य सुहास नाईक, संगिता पावरा, तळोदा प्रकल्पस्तरीय समिती अध्यक्ष तसेच खापर गटाच्या जि.प.सदस्या गिता पाडवी, धडगाव पं.स.सभापती हिरा पराडके, जि.प.सदस्य रविंद्र पराडके, गोराडी सरपंच केवजी पाडवी, तानाजी पाडवी, ईश्वर पावरा आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा येथे विद्युत दाबामुळे शॉर्टसर्किट होऊन विद्युत मीटर व उपकरणे जळून खाक

Next Post

भरत माणिकराव गावित यांच्या गाडीचा झाला अपघात, सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत नाही

Next Post
भरत माणिकराव गावित यांच्या गाडीचा झाला अपघात, सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत नाही

भरत माणिकराव गावित यांच्या गाडीचा झाला अपघात, सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत नाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add