नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्हयात आज दि.7 जानेवारी रोजी चार तालुक्यात तब्बल 18 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे.
नंदूरबार जिल्हयात आज दि.7जानेवारी रोजी दिवसभरात 18 कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. यात नंदूरबार तालुक्यात 12,नवापूर तालुक्यात 3, तळोदा, शहादा व अक्कलकुवा येथील एकाचा समावेश आहे.गेल्या 8 दिवसांपासुन नंदूरबार जिल्ह्यातील कोरोना रुग्ण सातत्याने वाढतांना दिसत आहे. सध्या नंदूरबार जिल्ह्यात सध्या 62 च्यावर कोरोना रुग्ण आहेत.नंदूरबार जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढू नये यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच लसीकरण करून घ्यावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.








