नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील खोंडामळी शिवारातील शेतात एका महिलेच्या गळ्यातील चैन जबरीने चोरी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका संशयिताविरोधात नंदूरबार तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील खोंडामळी शिवारातील शेतात संगिताबाई भिकन पाटील यांच्या गळ्यातील चैन हरेश गोकुळ भील याने जबरीने चोरी करण्याचा प्रयत्न केला. तसेच महिलेस चावा घेत हाताबुक्यांनी मारहाण करुन दुखापत केली. याबाबत संगिताबाई पाटील यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात संशयित हरेश भील याच्याविरुद्ध भादंवि कलम ३९४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी करीत आहेत.








