नंदूरबार l प्रतिनिधी
पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचे संशयावरुन इसम नामे सुभाष गावीत यास जिवेठार मारणाऱ्या आरोपीस सत्र न्यायालयाने जन्मठेपेची व १० हजाराची दंडाची शिक्षा ठोठावली आहे .
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी मारथाबाई सुभाष गावीत रा . लक्कडकोट , वडफळी ता.नवापुर यांच्या शेजारी आरोपी अमृत बाबु गावी याचे घर असल्याने तो फिर्यादी मारथाबाई यांचा पती सुभाष गावीत याच्यावर पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचे संशयावरुन मागील ३ वर्षापुर्वी सुभाष गावीत सोबत भांडण केले होते . नंतर गावपंचासमक्ष बसुन जातीरीतीरिवाजाप्रमाणे वाद मिटविण्यात आला होता . परंतु अमृत बाबु गावीत याचे मनात सुभाष गावीत यांच्याविरुध्द जुना राग असल्याने दि. ३० मार्च २०२० रोजी संध्याकाळी ७.१५ ते ७.३० वाजेचे दरम्यान लक्कडकोट , वडफळी ता.नवापुर जि.नंदुरबार या गावात पाण्याचे हौदाजवळ आरोपी अमृत गावीत य सुभाष गावीत याच्या डोक्यात कुऱ्हाड मारली होती . त्यावेळेस सुभाष गावीत हा जखमी झाला.त्याच्या डोक्यातुन रक्त वाहत असल्याने बेशुध्द पडला . नंतर आरोपी अमृत हा तेथेच कुऱ्हाड टाकुन पळुन गेला होता . सदर घटना ही गावातील सुवार्ता गावीत हिने सुभाष गावीत याची पत्नी मारथाबाई हिस सांगितल्याने फिर्यादी ही घटना झालेल्या ठिकाणी गेली असता तिचा पती सुभाष हा जमीनीवर पडलेला होता व त्याचे डोक्यातुन रक्त वाहत होते . त्याच वेळेस सुभाष गावीत यास फिर्यादी हिचा दिर अर्जुन गावीत व चंदु गावीत यांनी मोटार सायकलव्दारे सोनगड येथे दवाखान्यात उपचारकामी घेवुन निघाले असता सुभाष हा रस्त्यातच मयत झाला होता . आरोपी अमृत बाबु गावीत याच्या पत्नीसोबत सुभाष गावीत याचे अनैतिक संबंध असल्याचे संशयावरुनच अमृतने सुभाषचे डोक्यात कुऱ्हाडीने वार करुन जिवेठार केले आहे . अश्या फिर्यादीवरुन नवापुर पोलीस ठाण्यात भादविक . ३०२ , अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता . सदर खटल्याची सुनावणी ए . एस . भागवत , अतिरीक्त सत्र न्यायाधीश १ सो . नंदुरवार यांच्या कोर्टात होवुन आरोपी अमृत बाबु गावीत रा . लक्कडकोट , वडफळी ता.नवापुर जि.नंदुरबार यांच्या विरुध्द गुन्हा शावीत झाल्यानेन्यायालयाने जन्मठेपेची व रुपये १० हजार दंडाची शिक्षा सुनावली आहे . वरील गुन्हयाचा सखोल तपास करुन आरोपीतांविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र पो.नि. व्ही . एच . राजपुत तत्का नेमणुक नवापुर पोलीस ठाणे यांनी सादर केले होते . सदर खटल्याचे कामकाज अभियोग पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील ॲड.तुषार कापडीया यांनी पाहीले आहे . तसेच सदर खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोहेकॉ नितीन सावळे व पोना गिरीष पाटील यांनी कामकाज केले आहे . तपास अधिकारी व सरकारी वकील यांचे पोलीस अधीक्षक , नंदुरबार पी . आर . पाटील व अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी अभिनंदन केले आहे .








