Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आदिवासी संवर्धन परिषदे’च्या माध्यमातून आदिवासी संस्कृती संवर्धनासाठी काम करणार : आदिवासी विकास मंत्री ॲड.के.सी.पाडवी

team by team
January 4, 2022
in राजकीय
0
आदिवासी संवर्धन परिषदे’च्या माध्यमातून आदिवासी संस्कृती संवर्धनासाठी काम करणार : आदिवासी विकास मंत्री ॲड.के.सी.पाडवी

नंदूरबार l प्रतिनिधी
आदिवासी बांधवांच्या अधिकार व हक्कासाठी कार्य करणाऱ्या जयपाल सिंग मुंडा यांनी आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी दिलेला लढा अविस्मरणीय आहे. त्यांनी आदिवासी समाजाची बाजू संसदेच्या संविधान सभेत भक्कमपणे मांडून आदिवासींना न्याय मिळवून दिला. जयपाल सिंग मुंडा यांच्या जयंतीनिमित्त स्थापन केलेली ‘आदिवासी संवर्धन परिषद’ आदिवासी संस्कृती संवर्धनासाठी काम करेल, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी केले.
मानव शास्त्रज्ञ डॉ. आर. के. मुटाटकर यांच्या अध्यक्षतेखाली जयपाल सिंग मुंडा यांच्या 118 व्या जयंतीनिमित्त ऑनलाईन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या परिसंवादास जयपाल सिंग मुंडा यांचे सुपुत्र जयंत जयपाल सिंग मुंडा यांची विशेष उपस्थिती होती. साहित्य समिक्षक व भाषाशास्त्रज्ञ डॉ. गणेश देवी, आमदार कपिल पाटील, विभागाचे सचिव अनुप कुमार यादव, आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त राजेंद्र भारुड तसेच महाराष्ट्र, मध्यप्रदेश, झारखंड, आसाम, उत्तरप्रदेश, गुजरात, राजस्थान, जम्मू व काश्मिर या राज्यांतील राजकीय क्षेत्रातील आदिवासी समाजातील खासदार, आमदार व मान्यवर उपस्थित होते.
आदिवासी विकास मंत्री ॲड.पाडवी म्हणाले, संसदेच्या संविधान सभेमध्ये ‘आदिवासी’ हा शब्द भारतीय संविधानामध्ये समाविष्ट करण्यासाठी जयपाल सिंग मुंडा यांनी विशेष संघर्ष केला. परंतु, राज्यघटनेच्या मसुद्यामध्ये ‘आदिवासी’ हा शब्द समाविष्ट होऊ शकला नाही. आदिवासी संवर्धन परिषदेच्या माध्यमातून शासन यासाठी प्रयत्न करणार असून राज्यघटनेतील 1976 च्या घटनात्मक दुरुस्ती Area Remove Act, 1976 यातील अडचणी लक्षात घेता अनेक बाबींवर अभ्यास करण्याची गरज असल्याचे मत मंत्री ॲड.पाडवी यांनी व्यक्त केले.
या परिसंवाद प्रसंगी जयपाल सिंग मुंडा यांच्या जीवनदर्शिकेचे प्रकाशन व रेखाचित्राचे अनावरण आमदार कपिल पाटील व गणेश देवी यांच्या हस्ते करण्यात आले.
संविधान सभेत आदिवासींच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम जयपाल सिंग मुंडा यांनी केले होते. या महान अष्टपैलू व्यक्तिमत्वास त्यांच्या कार्यासाठी भारतरत्न मिळावा, त्यांच्या संसदेतील कार्याची ओळख भारतीय समाजाला व्हावी या दृष्टीकोनातून त्यांचा पुतळा संसदेच्या आवारात उभारण्यात यावा त्याचप्रमाणे राष्ट्रपुरूषांच्या यादीमध्ये जयपाल सिंग मुंडा यांचा समावेश करण्यात यावा यासाठी केंद्र शासनाकडे मागणी करणार आहे. तसेच त्यांचे तैलचित्र महाराष्ट्राच्या विधीमंडळ परिसरात लावण्यात येवुन आदिवासी विकासाच्या विविध योजनांना त्यांचे नाव देण्यात यावे याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती करण्यात येईल, अशी माहिती ॲड.पाडवी यांनी यावेळी दिली.
बिरसा मुंडा, ख्वाजा नाईक, उमाजी नाईक, तंट्या भिल्ल, राणी दुर्गावती, राघोजी भांगरे इ. क्रांतिकारकांनी आदिवासी समाजासाठी कार्य केले. त्यांचे नाव इतिहासात पाहायला मिळते. जयपाल सिंग मुंडा यांच्यावर बिहार, झारखंड या राज्यांत अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत, पुस्तकांच्या माध्यमातून अनेक लेखकांनी जयपाल सिंग मुंडा यांचे कार्य भारतीय समाजामध्ये विशेषत: आदिवासी समाजामध्ये पोहचविण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्रातही या पुस्तकांचे अनुवाद करून त्याद्वारे त्यांचे कार्य लोकांपर्यंत पोहचविण्याचा मानस ॲड. पाडवी यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
आमदार श्री.पाटील म्हणाले, जयपाल सिंग मुंडा हे उत्कृष्ट संसदपटू, हॉकीपटू होते. ते भारतीय हॉकी संघाचे कर्णधार असताना त्यांच्याच नेतृत्वाखाली ऑलिम्पिकमध्ये भारतास पहिले सुवर्ण पदक सन 1928 ला मिळाल्याची माहिती देवून जयपाल सिंग मुंडा यांच्या नावे राज्यात विद्यापीठ असले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
जयंत जयपाल सिंग मुंडा म्हणाले, आदिवासी समाजाची एक स्वतंत्र जीवनशैली आहे तसेच रुढी, प्रथा, परंपरा आहेत त्यांची जपणूक केली पाहिजे. आदिवासी हे मूळ निवासी आहेत. आदिवासींची जमीन हीच त्यांची ओळख आहे. आदिवासींना त्यांचे हक्क मिळाले पाहिजेत. त्यांनी आपल्या परंपरा जपल्या पाहिजेत.
परिसंवादाचे अध्यक्ष डॉ.आर.के. मुटाटकर म्हणाले, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंची आदिवासी विकासाबाबतची पंचशील तत्वे आदिवासी समाजाने स्वीकारुन आपला शाश्वत विकास करावा.
जयपाल सिंग मुंडा यांच्या भाषणात ‘आदिवासी हे प्रथम श्रेणीचे भारतीय नागरिक आहेत’, असा उल्लेख करीत असल्याचे सांगून जयपाल सिंग मुंडा हे संपादक, खेळाडू, शिक्षण तज्ज्ञ होते. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतले होते. ते खासदार होते. तसेच भारतीय सिव्हील सर्व्हिस (ICS) परीक्षा उत्तीर्ण होते, अशी माहिती डॉ.गणेश देवी यांनी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव अनुप कुमार यादव यांनी केले तर आयुक्त राजेंद्र भारुड यांनी आभार मानले. या परिसंवादांस देशभरातून पाच हजार लोकांनी ऑनलाईन पद्धतीने उपस्थिती लावली.

बातमी शेअर करा
Previous Post

युवा महोत्सवात म्हसावद येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेले आदिवासी होळी लोकनृत्यात नाशिक विभागीय स्तरावर प्रथम

Next Post

समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Next Post
समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे  हृदयविकाराच्या झटक्याने निधन

समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add