नंदूरबार l प्रतिनिधी
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची 191 वी जयंती निमित्त महिलांना आरक्षण देणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांना अभिप्रेत असा , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांच्या आदेशानुसार कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नंदुरबार सिव्हील हॉस्पिटल येथील महिला स्टाफ नर्स व महिला स्वच्छ्ता कर्मचारी यांचा साडी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्याचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार उदेसिंगपाडवी यांच्या हस्ते करण्यात आला , सदर कार्यक्रम हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल नंदुरबार जिल्हातर्फे आयोजित करण्यात आला होता.


कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. रामराव आघाडे, जिल्हा चिटणीस जितेंद्र कोकणी, नगर पालिका सेल जिल्हाध्यक्ष प्रकाश भोई, नंदुरबार शहराध्यक्ष नितीन जगताप, तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, तळोदा शहराध्यक्ष योगेश मराठे, तळोदा नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, तळोदा मार्केट कमिटी सदस्य भरत चौधरी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल नंदुरबार जिल्हाध्यक्ष कमलेश चौधरी यांनी केले होते.








