नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्हयात आज दि.३ जानेवारी रोजी तब्बल १३ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे.
नंदूरबार जिल्हयात सलग तीन दिवस तीन तीन रुग्ण आढळले होते.आज दि. ३ जानेवारी रोजी रात्री ८ वाजेला नंदुरबार प्रशासनातर्फे 94 जणांची आरटीपीसीआर चाचणी अहवाल प्राप्त झाला.त्यात नंदूरबार शहरातील ३ तर शहादा तालुक्यात 4 कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत.
दरम्यान प्रशासनातर्फे दि.३ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजेला पुन्हा 94 जणांची आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल प्राप्त झाला.त्यात नंदूरबार शहरातील ६ जणांचा अहवाल तर कोरोना पॉझिटीव्ह आढळला.दि.३ जानेवारी रोजी जिल्ह्यात एकूण १३ कोरोना रुग्ण आढळले.नंदूरबार
जिल्ह्यात ४ दिवसात २२ कोरोना रुग्ण आढळले आहेत.जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढू नये यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच लसीकरण करून घ्यावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.








