संस्कृतीचा उदय झालेल्या याहामोगी जन्मगाव हॅलो डाब येथे ज्येष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला हॅलो डाब येथील याहा मोगी मंदिराचे दर्शन घेऊन धरती मातेच्या गीत सादर करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

आदिवासी संस्कृती, रूढी, परंपरा, गीत, आदिवासी वस्तू, साहित्य, लग्न पद्धती, पाचवी अनुसूची कायदा, पेसा कायदा, फॉरेस्ट ॲक्ट अशा विविध विषयांवर विचार मंथन करण्यात आले. तसेच याहामोगी यांच्या जन्मगाव डाब येथे सांस्कृतिक केंद्र निर्मितीसाठी बैठकीत चर्चा करण्यात आली. आदिवासी संस्कृती टिकली पाहिजे; तिचे संवर्धन करून येणाऱ्या पिढीला माहिती उपलब्ध व्हावी. तसेच आदिवासी समाज अनेक समस्यांमध्ये विखुरला गेलेला आहे, त्याला एक स्थान मिळवून समस्या सुटल्या पाहिजे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ऐतिहासिक स्थळ असलेल्या हॅलो डाब येथे आख्यायिका मध्ये म्हटले जाते की अनेक देव-देवता एकत्र येऊन नियोजन बैठक घेत असत त्याच दृष्टिकोनातून समाजातील ज्येष्ठ विचारवंत नागरिक यांच्या वतीने या ठिकाणी समाजाला दिशा देण्यासाठी बैठकीमध्ये विचार मांडण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमश्या पाडवी होते. यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. ॲड. कैलास वसावे, धनसिंग दादा वसावे, नागेश दादा पाडवी, दामू ठाकरे, ॲड
अभिजीत वसावे, सामाजिक कार्यकर्ता अरुण वळवी, गीतकार प्रमोद ठाकरे, डॉ.दिलवरसिंग वसावे, दरबारसिंग पाडवी, दौलत महाराज, सामाजिक कार्यकर्ते ब्रिजलाल पाडवी, विक्रम वसावे, विकी वसावे आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








