नवापूर l प्रतिनिधी
वनविभागाची धडक कार्यवाही नवापूर तालुक्यातील भामरमाळ येथून 76 नग सागाच्या चौपट लाकडासह रंधा मशीन सह दीड लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही ही नंदुरबार शहादा उपवनसंरक्षक कृष्णा भवर व धुळे विभागीय वनाधिकारी दक्षता यांच्या मार्गदर्शनाखाली प्रादेशिक व वन्यजीव नंदूरबार सहाय्यक वनसंरक्षक धनंजय ग.पवार,नवापूर वनक्षेत्रपाल स्नेहल अवसरमल, खेकडा वनपाल भिवाजी दराडे, वनपाल ए.एम.शेख, वडकलंबी वनपाल सुनीता पाटिल,वनरक्षक कल्पेश अहिरे,कमलेश वसावे,संतोष गायकवाड, अमोल गावित,भाग्यश्री पावरा,विकास शिंदे,वाहन चालक साहेबराव तुंगार, दिलीप गुरव,वन मजूर दिवांजी गावित,आंत्या गावित,गुलाब गावित,रवी गावित,अनिल गावित यांनी सदर कारवाईत सहभाग घेतला होता नवापूर तालुक्यातील भामरमाळ गावात जाऊन येथील रहिवासी यशवंत गावित यांच्या घराचे सर्च वॉरंटने झडती घेतली असता त्याच्या घराच्या पडसाळीत व घराजवळ असलेल्या ऊसाच्या शेतात कुर्हाडीने घडताळ केलेले 76 सागाचे चौपट नग व रंधामशीन मोटरसह मिळुन आले असून सदर मालाची बाजार भावानुसार किंमत दीड लाख रुपये आहे. याबाबत वनरक्षक नंदुरबार व वन विभाग शहादा यांच्याकडून जनतेस आवाहन करण्यात येत आहे की वन व वन्यजीव तसेच अवैध लाकूडतोड संबंधित कुठलाही गैरप्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक 1926 वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.








