Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खेतिया बाजार समितीतुन ट्रॅक्टर चोरी करीत थेट कापुस विकला जिनिंग प्रेसमध्ये, मुद्देमालासह नंदुरबार तालुक्यातील एकाला पोलीसांनी केली अटक

team by team
January 2, 2022
in क्राईम
0
खेतिया बाजार समितीतुन ट्रॅक्टर चोरी करीत थेट कापुस विकला जिनिंग प्रेसमध्ये, मुद्देमालासह नंदुरबार तालुक्यातील एकाला पोलीसांनी केली अटक

खेतिया | वार्ताहर
खेतिया येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कापसाने भरलेले ट्रॅक्टरचोरट्यांनी लांबविला खेतिया पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवीत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे माहिती काढली असता असता चोरट्यांनी चक्क नंदुरबार तालुक्यातील एका जिनिंग मध्ये विकला पोलीसांनी याप्रकरणी कापसासह टॅक्टर जप्त केले असुन याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.


याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खेतिया येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मलगाव ता.शहादा येथील शेतकरी दिलीप आपसिंग पाडवी यांनी कापसाने भरलेला ट्रॅक्टर – ट्राली लिलावासाठी उभा केला होता. ट्रॅक्टर मालक व चालक सदर वाहन हे बाजार समितीत उभा करून दि.२८ डिसेंबर २०२१ रोजी रात्री घरी झोपण्यासाठी निघून गेले त्या दरम्यान सदर ट्रॅक्टर अज्ञात व्यक्तीने रात्री २ वाजेच्या सुमारास सुरू करून भरलेल्या कापसासह पोबारा केला. सकाळी ट्रॅक्टर मालक आल्यावर आपले ट्रॅक्टर जागेवर नाही असे समजताच त्यांनी खेतिया येथील बाजार समिती व खेतिया पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली. तात्काळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष सावळे यांनी त्वरित तपासाची चक्रे फिरवली आणि जागोजागी लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे माहिती काढली असता सदर कापसाने भरलेला ट्रॅक्टर हा नंदुरबारचे दिशेने घेऊन गेल्याचे निदर्शनास आले. दरम्यान त्वरित एक टीम (पथक) गठीत (तयार) केली आणि पोलिसांनी तपासाची गती मिळाली. दोन दिवसाच्या अथक परिश्रमानंतर नंदुरबार जवळील नारायण जिनिंग येथे कापूस विक्री होत असल्याचे तपासातून समजले आणि पोलिस त्वरित घटनास्थळी रवाना झाले. तोपर्यंत आरोपीने कापूस विक्री करून ट्रॅक्टर ट्रॉली इतर ठिकाणी नेल्याचे समजले. त्या ठिकाणाहून ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले व जिनिंग मध्ये विकलेला कापूसही पोलिसांनी ताब्यात घेतला. खेतिया पोलिसांनी २८ डिसेंबरच्या रात्री कृषी उत्पन्न बाजार समिती खेतिया येथे कापसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली चोरणार्‍या आरोपीला पकडले आहे. पोलीस विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, खेतिया पोलिसांनी एक पथक तयार करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी दादाभाई बाळू पाटील रा.कार्ली ता.नंदुरबार याला पकडले. येथून कापूस भरलेली ट्रॉली घेऊन व नंदुरबार जिल्ह्यातील कोळदा येथून दुसरा ट्रॅक्टर भाड्याने घेऊन आरोपींने नारायण कोटेक्स जिनिंग फॅक्टरी येथे जाऊन कापूस विकला होता. या विक्रीची माहिती मिळताच पोलीस पोहोचले व चोरीला गेलेला ट्रॅक्टर जप्त करून कापसाने भरलेली ट्रॉली जप्त करून खेतिया पोलीस ठाण्यात आणली. २५ डिसेंबरच्या रात्री चोरी झालेली मोटारसायकल ही पोलिसांनी आरोपींकडून चोरीची मोटार सायकलही जप्त केली. शनिवारी १ जानेवारी २०२२ रोजी बडवानी पोलीस अधीक्षक दीपक शुक्ला हे खेतिया येथे पोहोचल्यानंतरयांनी त्यांनी पोलीस पथकाच्या या यशाबद्दल १० हजार रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले. यावेळी त्यांनी सांगितले की, पोलीस विभागाच्या पथकाने १० लाखांहून अधिक किमतीचा माल जप्त केला आहे, तसेच आरोपी देखील पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकात खेतिया पोलीस निरीक्षक संतोष सावळे, पोलिस उपनिरीक्षक रितेश खत्री (सायबर शाखा), सहायक पोलिस उपनिरीक्षक कैलाश चौहान, अनिल पाठक, हवालदार हेमंत मंडलोई, चालक लीला शंकर, सैनिक अशोक, कैलास यांचा समावेश होता. शेतकरी दिलीप आपसिंग पाडवी यांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले व त्यांचे सत्कार व अभिनंदन केले तसेच बाजार समितीचे सचिव श्री.जामरे यांनीही पोलिस प्रशासनाचे आभार मानले.

बातमी शेअर करा
Previous Post

म्हसावद येथे सोन्याचांदीचे व भांड्याचे दुकान फोडून पावणे दोन लाखाचा मुद्देमाल लंपास,पोलीस स्टेशनच्या कुंपणलगत केली हिस्से वाटणी

Next Post

वाघासारख्या वन्य प्राण्याचे कातडे तस्करी प्रकरणी सागबारा पोलिसांनी केली अक्कलकुवा येथील कृषी विस्तार अधिकाऱ्यास अटक

Next Post
नंदूरबार शहरात सलग तिसऱ्या दिवशी आयकर विभागाच्या पथकाची कारवाई, बँकेमध्ये असलेल्या वैयक्तिक लॉकरची केली तपासणी

वाघासारख्या वन्य प्राण्याचे कातडे तस्करी प्रकरणी सागबारा पोलिसांनी केली अक्कलकुवा येथील कृषी विस्तार अधिकाऱ्यास अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add