Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

म्हसावद येथे सोन्याचांदीचे व भांड्याचे दुकान फोडून पावणे दोन लाखाचा मुद्देमाल लंपास,पोलीस स्टेशनच्या कुंपणलगत केली हिस्से वाटणी

team by team
January 2, 2022
in क्राईम
0
म्हसावद येथे सोन्याचांदीचे व भांड्याचे दुकान फोडून पावणे दोन लाखाचा मुद्देमाल लंपास,पोलीस स्टेशनच्या कुंपणलगत केली हिस्से वाटणी

म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील म्हसावद येथे भरचौकात असलेले सोन्याचांदीचे दुकान आणि भांड्याचे दुकान फोडून वर्षाच्या पहिल्याच दिवशी चोरांनी डाव साधला असून रोकडसह एक लाख पासष्ट हजार रूपयाचे दागीने व भांडी चोरून नेली आहेत.म्हसावद पोलीसांना वर्षाच्या पहिल्याच दिवशी चोरांनी आव्हान दिले आहे.

याबाबत म्हसावद पोलीस सुत्रानुसार माहीती अशी की,शनिवारी रात्री म्हसावद येथील बाजारपेठेत हनुमान चौकात असलेले निलेश नंदकिशोर शिंपी(शहादा) यांचे शिव ज्वेलर्स व जितेंद्र ब्रिजलाल शिंपी(म्हसावद) यांचे लक्ष्मी स्टील नावाचे भांड्यांचे दुकान चोरांनी शटर उचकवून  चोरी केली.यात शिव ज्वेलर्सच्या दुकानातून चांदीच्या बांगड्या जोड, वेल्याचा जोड,अंगठ्या,मंदीरातील देवाना असलेला दागीन्यांचा चांदीचा श्रृंगार, पाटल्या, साखळ्या, गोट,तार,बाळ्या,सी.सी.टी.व्ही कॅमेरा,एल.ई.डी असा एकून एक लाख सत्तेचाळीस हजाराचा माल लंपास केला तर लक्ष्मी स्टील दुकानातून स्टीलचा गल्ला,चिल्लरसह रोकड अठरा हजार रूपयाची चोरी केली. चोरांनी चोरी करून म्हसावद पोलीस स्टेशनच्या कुंपणलगत असलेल्या काटेरी बाभळीत हिस्से वाटणी केली ही विशेष बाब आहे.त्या ठिकाणी ज्वेलर्सच्या दुकानातून चोरून आणलेल्या दागीन्यांच्या पेट्या ऊघडवून चोरांनी महत्वाची कागदपत्रे,सीसीटीव्ही कॅमेरा साहीत्य,पॅकींग साहीत्य फेकून दिले होते.घटना स्थळी पोलीस विभागीय अधिकारी श्रीकांत घुमरे,स्थानिक गुन्हा अन्वेषन शाखेचे रविंद्र कळमरकर,म्हसावद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार,पोलीस उपनिरीक्षक सुनिल बि-हाडे यांनी भेट देवून चौकशी केली.डॉग स्क्वाडने कन्हेरी नदीवरील पुलापर्यंत मार्ग दाखवून थांबले.याबाबत म्हसावद पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार जिल्हात आज पुन्हा आढळले तीन कोरोना रुग्ण, तीन दिवस आढळले 9 रुग्ण

Next Post

खेतिया बाजार समितीतुन ट्रॅक्टर चोरी करीत थेट कापुस विकला जिनिंग प्रेसमध्ये, मुद्देमालासह नंदुरबार तालुक्यातील एकाला पोलीसांनी केली अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add