नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्हयात दोन दिवस सलग कोरोना तीन रुग्ण आढळले होते आज दि.2 जानेवारी पुन्हा तीन जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे.
नंदूरबार जिल्हयात सलग तीन दिवस तीन तीन रुग्ण आढळले.नंदूरबार जिल्ह्यातील नंदूरबार तालुक्यात 2 तर नवापूर तालुक्यातील एकाचा असे तिघे दि.31 डिसेंबर रोजी कोरोना पॉझिटीव्ह आढळले होते.काल दि.1 जानेवारीला पुन्हा जिल्ह्यातील तिघांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला होता.आज दि. 2 जानेवारी रोजी नंदुरबार प्रशासनातर्फे 94 जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली.त्यात नंदूरबार शहरातील तिघे कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. सध्या नंदूरबार जिल्ह्यात सध्या 12 कोरोना रुग्ण आहेत.जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढू नये यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच लसीकरण करून घ्यावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.








