नंदूरबार l प्रतिनिधी
नववर्षाच्या पूर्वसंध्येला अनेक युवक पार्टी चे नियोजन करण्यासाठी फिरत असतात.तर काही युवक वेगळ्याच धुंदीत फिरतात याबाबत एक अपवाद मोलगी येथील तरुणांचा आहे.आज येणाऱ्या नवीन वर्षानिमित्त ओलीमाता युवा सेनेतर्फे
मोलगी शहरात सापसफाई शहर स्वच्छ ठेवण्याचा निश्चय केला.
आज दि.३१ डिसेंबर रोजी येणाऱ्या नवीन वर्षानिमित्त ओलीमाता युवा सेना संघटनेमार्फत मोलगी येथील तरुणांनी स्वच्छता आरोग्य ही नवीन संकल्पना निश्चित करुन आज संपूर्ण मोलगी शहरात सापसफाई करुन गांव व शहर स्वच्छ ठेवण्याचा निश्चय केला.

आरोग्याला जोड ही स्वच्छता असते मात्र ग्रामीण रुग्णालय मोलगी येथिल घाणीचे साम्राज्य असल्या कारणाने रुग्णालयाच्या आवारात सापसफाई करण्यासाठी गेले फक्त तुम्ही शो दाखवण्यासाठी किंवा फोटो काढण्यासाठी स्वच्छता करता आहे. असा विरोध एक वैद्यकीय अधिकारी मार्फत दर्शविला गेल्याने युवकांना हे खेदजनक वाटले.तरीही युवकांनी साफ सफाई केली.यावेळी विकी वसावे,सुखदेव वसावे रामसिंग वसावे, किरण वसावे,सोन्या वसावे, लक्ष्मण वसावे, सुनील वसावे, यांच्यासह ओलीमाता युवासेना संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.








