Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कापसाच्या उभ्या पिकावर शेतकऱ्याने फिरवला नागर, बोंडअळीसह बुरशीजन्य रोगांमुळे उत्पादनात घट

team by team
December 31, 2021
in कृषी
0
कापसाच्या उभ्या पिकावर शेतकऱ्याने  फिरवला नागर, बोंडअळीसह बुरशीजन्य रोगांमुळे उत्पादनात घट

बोरद l वार्ताहर
बोंडअळीसह बुरशीजन्य रोगांमुळे उत्पादनात घट झाली असून शेतकऱ्याचा खर्च ही निघणे मुश्किल झाले आहे. याला कंटाळून तळोदा तालुक्यातील मोड येथील कापूस उत्पादक शेतकरी किशोर पाटील यांनी उभ्या कापसाच्या पिकावर नांगर फिरवल्याची घटना घडली आहे.
तळोदा तालुक्यातील बोरद सह परिसरात कापूस पिकावर पडलेल्या बोंडअळीसह बुरशीजन्य रोगांमुळे उत्पादनात घट झाली असून शेतकऱ्याचा खर्च ही निघणे मुश्किल झाले आहे. या वर्षी पावसाच्या अनियमित पणामुळे शेतकऱ्याने प्रयत्नांची पराकाष्ठा करून कापूस जगवला होता. मात्र सतत होणाऱ्या हवामान बदलामुळे कापूस पिकावर याचा परिणाम झाला कधी अवकाळी पाऊस,गारठा, सूर्यदर्शन या अशा आस्मानी संकटाना शेतकऱ्याला सामोरे जावे लागते. या वर्षी कापसाला सात ते आठ हजार रुपये क्विंटल ने भाव असल्याने शेतकऱ्याने कापूस पिकावर मोठ्या प्रमाणात खर्च केला.पण बुरशीजन्य रोगांमुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणत घट झाली व बोंडअळी पडल्याने एकरी क्विंटल ही निघणे मुश्कील झाले. तळोदा तालुक्यातील मोड येथील कापूस उत्पादक शेतकरी किशोर पाटील यांनी उभ्या कापसाच्या पिकावर नांगर फिरवला असल्याचे दिसून आले. यावेळी त्यांनी सांगितले की,चार एकर क्षेत्रावर कापसाची लागवड केली होती. त्याला एकरी खर्च २० हजार केला असे चार एकर क्षेत्रावर एकूण ६० ते ७० हजार रु खर्च झाला मात्र चार एकर क्षेत्रात फक्त तीनच क्विंटल उत्पादन झाले.
बोरद,मोड, खरवड,मालदा, तुळजा या भागात या वर्षी कापसाची लागवड शेतकऱ्याने केली मात्र बुरशीजन्य रोगांमुळे उत्पादनात घट झाली. त्यामुळे आता शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्याला आधार देण्याची गरज असल्याने शासनाने पंचनामे करून मदत जाहीर करावी अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

कुठला गाजावाजा न करता : मित्र परिवाराच्या मदतीने आश्रमात दोन वर्षांपासून नर्मदा परिक्रमा करणार्‍या 200 भाविकांसाठी रोज केली जातेय निवारा,जेवण, आरोग्याची सोय

Next Post

चरणमाळ घाटात ट्रक 150 फूट दरीत कोसळली, गावकऱ्यांच्या मदतीने चालक व सहचालकाला बाहेर काढून रुग्णालयात केले दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add