Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कुठला गाजावाजा न करता : मित्र परिवाराच्या मदतीने आश्रमात दोन वर्षांपासून नर्मदा परिक्रमा करणार्‍या 200 भाविकांसाठी रोज केली जातेय निवारा,जेवण, आरोग्याची सोय

team by team
December 31, 2021
in सामाजिक
0
कुठला गाजावाजा न करता : मित्र परिवाराच्या मदतीने आश्रमात दोन वर्षांपासून नर्मदा परिक्रमा करणार्‍या  200 भाविकांसाठी रोज केली जातेय निवारा,जेवण, आरोग्याची सोय

नंदुरबार l प्रतिनिधी
धडगांव तालुक्यातील धनाजे खु. येथील श्री.शंकर आदिवासी विकास बहुउद्देशीय संस्था व मित्र परिवारातर्फे येथील नर्मदा परिक्रमा आश्रमात गेल्या दोन वर्षापासून नर्मदा परिक्रमा करणार्‍या भाविकांसाठी दोन वेळेचे मोफत जेवण व चहा नाश्ताची सोय करण्यात आली आहे. मात्र याबाबत कोणाकडेही मागणी न करता कुठलाही गाजावाजा न करता दररोज १५० ते २०० भाविकांची सेवा करण्यात येते.


कोरोना काळात जिल्हाभर अनेक नागरीक गरजूंच्या मदतीसाठी सरसावले होते. काहींनी थोडीशी मदत करत मोठा गाजावाजा करतांनाही दिसले होते. मात्र या काळातही नर्मदा परिक्रमा करणार्‍या भाविकांची मोठी संख्या होती. याकाळात हॉटेल बंद, दुकाने बंद त्यामुळे परिक्रमा करणार्‍या भाविकांपुढे अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. यावर उपाय म्हणून धडगांव तालुक्यातील धनाजे खुर्दे येथील मित्र मंडळींनी एकत्र येत कुठलाही गाजावाजा न करता नर्मदा परिक्रमा करणार्‍या भाविकांना मदत करण्याचे ठरविले. त्यानुसार धनाजे खुर्दे येथील आपसिंग महाराज हे नर्मदा परिक्रमा करणार्‍या भाविकांसाठी त्यांच्या घरीच जमेल तेवढी मदत करत असत. आपसिंग महाराजांची सुभाष पावरा यांची भेट झाल्यानंतर नर्मदा परिक्रमा करणार्‍या भाविकांसाठी विस्तारीतपणे आश्रम उभारून त्यांची जेवणाची व निवार्‍याची सोय करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार सुभाष पावरा यांनी यशवंत पाटील यांच्यासह जत्र्याबाबा यांच्यासह मित्र परिवाराला याबाबत कल्पना दिली. त्यानंतर सगळयांनी मिळून धनाजे खुर्दे येथे जागा विकत घेवून आश्रम उभारला. त्याठिकाणी खा.डॉ.हिना गावीत २५.१५ मधून याठिकाणी इमारत तयार करून दिली. त्याठिकाणी सगळयांनी मिळून मंदिराची स्थापना केली. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना काळातही नर्मदा परिक्रमा आश्रमात रोज १५० ते २०० भाविक याठिकाणी मुक्कामाला थांबतात. त्यांची राहण्याची, जेवणची व आरोग्याची व्यवस्था येथे करण्यात येते. याठिकाणी सर्वांच्या मदतीने आश्रमात रोजचा खर्च केला जातो. आश्रमासाठी कोणाकडूनही पैशांची मदत न स्विकारता वस्तु स्वरूपात मदत स्विकारली जाते. कुठलाही गाजावाजा न करता गेल्या दोन वर्षांपासून १५० ते २०० नर्मदा परिक्रमा करणार्‍या भाविकांची येथे व्यवस्था करण्यात येते. या आश्रमासाठी सुभाष पावरा, दिपक शिवदे, लतिश मोरे, आपसिंग पावरा, घनश्याम महाराज, यशवंत पाटील, झोमा पावरा, येशु महाराज, पप्पु परमार, डॉ.संतोष परमार, जत्र्या बाबा, वेंद्या बाबा, भरत पावरा, पतंग भंडारी, बारकू महाराज यांच्या मित्र परिवारातर्फे याठिकाणी लागणारी गरजेचा पुरवठा करण्यात येतो. याठिकाणी दोघे वेळेचे जेवण स्थानिक नागरीक व नर्मदा परिक्रमा करणारे भाविक करीत असतात.

देशातील विविध राज्यातील भाविक नर्मदा परिक्रमेसाठी पदयात्रा करतात. या दरम्यान दुर्गम भागात भाविकांना राहण्याची व जेवणाची मोठी गैरसोय होते. हा विचार करून मित्र परिवारातर्फे धनाजे खुर्द येथे मित्र परिवारातर्फे नर्मदा परिक्रमा आश्रम चालवला जातो. येथे कोणाकडूनही न मागता दाते मोठया प्रमाणावर मदत करतात. मदतही पैशांच्या स्वरूपात न स्विकारता वस्तुरूपात स्विकारली जाते. सर्व मित्र परिवार याठिकाणी येवून सेवा करीत असतात.
सुभाष पावरा
धनाजे खुर्द ता.धडगांव

नर्मदा परिक्रमा करत असतांना गेल्या दोन दिवसापासून धनाजे खुर्दे येथील आश्रमात आम्ही वास्तव्य करीत आहोत. याठिकाणी भाविकांची मोठया प्रमाणावर सोय करण्यात आली आहे. निवार्‍यासह चहा, दोनवेळेचे जेवण, आरोग्याचीही काळजी घेतली जाते. नर्मदा परिक्रमाही प्रशासनाने किनार्‍यावरून करण्यात यावी.
ररमेश कुवरजी मिस्तरी
डोंबिवली (जि.ठाणे)

बातमी शेअर करा
Previous Post

अखेर अशा प्रकारे बिबट्याला करण्यात आले जेरबंद, बिबट्याच्या पायातील चिमटा काढण्यात आले यश

Next Post

कापसाच्या उभ्या पिकावर शेतकऱ्याने फिरवला नागर, बोंडअळीसह बुरशीजन्य रोगांमुळे उत्पादनात घट

Next Post
कापसाच्या उभ्या पिकावर शेतकऱ्याने  फिरवला नागर, बोंडअळीसह बुरशीजन्य रोगांमुळे उत्पादनात घट

कापसाच्या उभ्या पिकावर शेतकऱ्याने फिरवला नागर, बोंडअळीसह बुरशीजन्य रोगांमुळे उत्पादनात घट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add