धडगाव l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील उमराणी बु. ग्रामपंचायतीची ९ महिन्यानंतर ग्रामसभा झाली. यात ५ टक्के पेसा निधीच्या अध्यक्ष व सदस्याची निवड करण्यात आली.
धडगांव तालुक्यातील ग्रामपंचायत उमराणी बु. ची ग्रामपंचायत सार्वत्रीक निवडणूक जानेवारी २०२० मध्ये झाली.गेल्या ९ महिन्यापासून कोषा समितीच्या अध्यक्षपद निवडीकरिता ग्रामसभा घेण्यात आली नाही . ग्रामसभेसाठी पंचायत समिती धडगांव कडून आदेश मिळाल्यामुळे ग्रामसभा घेण्याच मार्ग मोकळा झाला. या ग्रामसभेचे अध्यक्षस्थान आशा वंतीलाल पावरा यांनी स्विकारले अध्यक्षाच्या आदेशाने ग्रामसभा सुरु करण्यात आली. या ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायत सदस्यामधून ईश्वर चिठ्ठी काढून ५ टक्के पेसा निधीच्या अध्यक्ष व सदस्याची निवड करण्यात आली.
यात उमराणी बु.कोषा समितीच्या अध्यक्षपदी चंद्रसिंग गुलाबसिंग पावरा तर सदस्य पदी लता रविंद्र पावरा, उमराणी खुर्द कोषा समितीच्या अध्यक्षपदी रमेश पुंजु पावरा तर सदस्य म्हणून अनिता हेमंत पावरा यांची निवड झाली. उमराणी बु. व उमराणी खुर्द या दोन्ही गावाचे कोषा समितीचे सचिव म्हणून ग्रामसेवक डी.पी.माळी असणार आहे. तसेच ग्रामसभेमध्ये मागील प्रोसिडिंग बुक वाचन करुन विविध विकास कामांबाबत चर्चा करून नविन कामे मार्गी लावले जाईल असे ग्रामसभेमध्ये सांगण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून शोभाबाई फत्तेसिंग पावरा, वंतीलाल पावरा, फत्तेसिंग पावरा, पालसिंग पावरा, हेमंत पावरा, आकाश पावरा, विशाल पावरा, चेतन पावरा, ग्रामपंचायत सदस्य,युवक, ग्रामस्थ आदी ग्रामसभेमध्ये उपस्थित होते.








