Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पिण्याच्या पाण्याची नियमित तपासणी करून ग्रामस्थांना शुद्ध पिण्याचे पाणी द्या : मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे

team by team
December 29, 2021
in आरोग्य
0
पिण्याच्या पाण्याची नियमित तपासणी करून ग्रामस्थांना शुद्ध पिण्याचे पाणी द्या : मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे

नंदुरबार l प्रतिनिधी
अतिदुर्गम भागात ग्रामस्थांना पिण्याचे शुद्ध व नियमित पाणी मिळावे यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामस्तरावर पिण्याच्या पाण्याची तपासणी करता यावी. यासाठी जिल्हा परिषदेमार्फत जलसुरक्षक व स्थानिक महिलांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रशिक्षित केले जात आहे. स्वच्छ दिसणारे पाणी पिण्यासाठी योग्य असेलच असे नाही. यामुळे पिण्याच्या पाण्याची नियमित तपासणी करून ग्रामस्थांना शुद्ध पिण्याचे पाणी देऊन ग्रामस्थांचे आरोग्यमान सुदृढ करावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले .
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲङ सिमा वळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली याहा मोगी सभागृहात जलजीवन मिशन अंतर्गत पाणी गणवत्ता विषयक प्रशिक्षकांचे एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गावडे बोलत होते. दूषित पाण्यामुळे ८० टक्के आजार होतात. पावसाळ्यात किंवा इतर वेळी पाण्याची गुणवत्ता ग्राम स्तरावर फिल्ड टेस्ट किटच्या सहाय्याने ग्राम पंचायत स्तरावर तपासता यावी यासाठी प्रत्येक गावात पाच महिलांची निवड करण्यात आली असून त्यांना पाणी तपासणी करता यावी यासाठी जिल्हयातील तालुका निहाय 10 जलसुरक्षकांची प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे . या प्रशिक्षकांचे प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण घेण्यात येत आहे. यामुळे आपण सर्वांनी हे प्रशिक्षण घेवून ग्राम स्तरावरील महिलांना प्रशिक्षित करावे असे आवाहनही गावडे यांनी केले.
प्रशिक्षणास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती गणेश पराडके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार उपस्थित होते.प्रशिक्षणाचे प्रास्ताविक जल जीवन मिशनच्या प्रकल्प संचालक डॉ. वर्षा फडोळ यांनी केले. यावेळी डॉ. वर्षा फडोळ यांनी प्रशिक्षणास उपस्थित जलसुरक्षक यांना प्रशिक्षण देणे मागील उद्देश व प्रशिक्षण घेतल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर घ्यावयाच्या प्रशिक्षणाबाबत तसेच प्रशिक्षण कालावधीत शासनामार्फत प्रत्येक ग्रामपंचायतीत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या फिल्ड टेस्ट किट चा वापर कसा करावयाचा याविषयी मार्गदर्शन केले. यानंतर जलसुरक्षक यांना सभापती गणेश पराडके, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, डॉ. वर्षा फडोळ, साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. नारायण बाबा यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी पाणी व स्वच्छता कक्षातील पाणी गुणवत्ता निरीक्षक किशोर सोनवणे, पाणी गुणवत्ता सल्लागार नितीन पाटील यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणास प्रत्येक तालुक्यातील दहा जलसुरक्षक सर्व विस्तार अधिकारी (पंचायत / आरोग्य), जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सुनील पाटील, सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी, जिल्हा पाणी व स्वच्छता कक्षातील तज्ञ सल्लागार, गट समन्वयक व समुह समन्वयक उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

भरधाव ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक घुसला थेट शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये

Next Post

आरोग्य सेवा अधिक बळकट करणार : सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे

Next Post

आरोग्य सेवा अधिक बळकट करणार : सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add