नंदुरबार ! प्रतिनिधी
नूतन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी पदभार स्विकारला.यावेळी भालेर येथील विद्यार्थिनीच्या हस्ते जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचा सत्कार करण्यात आला.
नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात नूतन जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांचा सत्कार भालेर गावातील इयत्ता 9 वीत शिकणारी मुलगी प्रियंका वकील पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलचे जिल्हा अध्यक्ष आनंदा कैलास पाटील, साहेबराव कोळी, विलास भाई ,वासुदेव माळी, हिमांशू तांबोळी
शैला ताई, जगन ठेलारी तसेच राष्ट्रवादी ग्रुप चे सदस्य उपस्थित होते.