Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथे उद्या मोफत थैलेसिमिया व सिकलसेल तपासणी शिबिर

team by team
December 25, 2021
in आरोग्य
0
नंदूरबार l
नंदुरबार येथील डॉ.अर्जुन लालचंदाणी परिवारातर्फे आज दि.२६ डिसेंबर रविवार रोजी मोफत थैलेसिमिया व सिकलसेल तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पंधरा वर्षावरील मुल-मुली व नवदाम्पत्य ज्यांना मुल होणे बाकी अशांनी ही तपासणी अवश्य करुन घ्यावी, असे आवाहन डॉ.अर्जुन लालचंदाणी यांनी केले आहे.
इंडीयन कॉन्सिल ऑफ मेडीकल रिसर्च हिमोग्लोबीनोपॅथी डिपार्टमेंट मुंबईचे नंदुरबार युनिट व जनकल्याण रक्त केंद्र नंदुरबार यांच्या सहकार्याने व डॉ.अर्जुन लालचंदाणी परिवारातर्फे आज सकाळी १० ते दुपारी वाजेपर्यंत येथील गुरु जो दर, नवी सिंधी कॉलनी येथे हे राबविण्यात येणार आहे. थैलेसिमिया व सिकलसेल हे आजार अनुवांशिक असून ते शंभर टक्के टाळता येतात. त्यासाठी मुलगा व मुलीचे विवाहपूर्वक रक्त तपासणी करुन ते थैलेसिमिया मायनर किंवा सिकलसेल कॅरिअर आहेत किंवा कसे? ते ठरविता येते. दोन थैलेसिमिया मायनर मुलगा व मुलगी किंवा सिकलसेल कॅरिअर मुलगा किंवा मुलगीचे विवाह टाळणे हा यावर सर्वोत्तम उपाय आहे. लग्नानंतर पती व पत्नी दोन्ही थैलेसिमिया मायनर किंवा सिकलसेल कॅरिअरची माहिती झाल्यास गर्भधारणेच्या बारा ते चौदा आठवड्यात गर्भाशय तपासणी करुन होणारे बाळ थैलेसिमिया किंवा सिकलसेलग्रस्त आढळल्यास त्याप्रमाणे उपाय करतात येतात, अशी माहिती डॉ.अर्जुन लालचंदाणी यांनी दिली. विशेषतः सिंधी समाजात थैलेसिमिया व आदिवासी समाजात सिकलसेलचे प्रमाण जास्त आहे. जिल्ह्यातील पहाडी भागातील आदिवासींमध्ये हे विशेष करुन आढळते. सबब शासनाने नंदुरबार जिल्ह्यासाठी विशेष सिकलसेल युनिट दिले आहे. तरी जास्तीत जास्त नागरीकांना याचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ.अर्जुन लालचंदाणी यांनी केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

अटलबिहारी वाजपेयी वाचनालयातर्फे भारतरत्न वाजपेयी यांना आदरांजली

Next Post

बोरद परीसरात बिबट्याचा दिवसा ढवळ्या वावर

Next Post

बोरद परीसरात बिबट्याचा दिवसा ढवळ्या वावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add