तळोदा ! प्रतिनिधी
सुनेस मानसिक व शारीरिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेल्या सासू , सासरे व पती यांची सखोल चौकशी करून कठोर शिक्षा देऊन पीडितेस न्याय मिळावा यासाठी क्षत्रियमराठा समाजातर्फे तहसीलदार गिरीश वखारे यांना निवेदन देण्यात आले .
या निवेदनात म्हटले आहे की, १७ जून २०२१ रोजी सासू सासऱ्यांच्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून साक्षी अमित शिंदे या युवतीने नाशिक येथे आत्महत्या करून आपले जीवन संपवले . साक्षीचा विवाह थाटामाटात व मानपानासह ५ फेब्रुवारी २०२८ रोजी नंदुरबार येथे पार पडला होता . तरीही तिच्या सासू – सासऱ्याने वेळोवेळी तिच्या मानसिक , शारीरिक छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले . त्यामुळे दोषींवर कारवाई करून शिक्षा देऊन पीडितेस न्याय मिळवून देण्याची विनंती केली आहे . निवेदनावर नवनीत शिंदे , महेंद्र गाढे , शांताराम गायकवाड , दिलीप जगदाळे , शिवराम मराठे , मोहन पोटे , मधुकर पवार , विनोद चव्हाण , अशोक चव्हाण , सुभाष शिंदे , संजय बोराणे , विश्वनाथ बोराणे , युवराज चव्हाण , नरेंद्र मराठे , चंद्रकांत मराठे , सुनील मराठे , गणपत चित्ते , जगन्नाथ मराठे , प्रभाकर उगले , दिनेश शिंदे , जगदीश शिंदे , संजय गाढे आदींच्या सह्या आहेत .