Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आठवड्यात दुसरा बिबट्या मृत अवस्थेत आढळल्याने खळबळ

team by team
December 22, 2021
in क्राईम
0
आठवड्यात दुसरा बिबट्या मृत अवस्थेत आढळल्याने खळबळ

तळोदा l प्रतिनिधी

मोड येथील भगवान देवराम शिंदे यांच्या शेतात बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला आहे. दरम्यान याआधीही मोड येथेच एक बिबट्या मृत आढळून आला होता आणि आज दुसरा. आठवड्याभरात दोन बिबट्याचा जीव गेल्याने प्राणी प्रेमींमधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सविस्तर घटना अशी की, तळोदा तालुक्यातील मोड येथील भगवान देवराम शिंदे यांच्या शेतात ऊसाची तोडणी सुरु आहे. ऊस तोडणी करीत असतांना दुपारी ३ वाजेचा सुमारास ऊस तोडणी करणाऱ्या मजुरांना प्रचंड दुर्गंधी येऊ लागली. मजुर त्यादिशेला गेले असता त्यांना तिथे एक बिबट्या मृत अवस्थेत दिसून आला. मजुरांनी सदर बाब शेतमालक भगवान देवराम शिंदे रा मोड ता तळोदा यांना कळवली. शेतमालकाने लागलीच तळोदा वनविभागाशी संपर्क साधून सदर घटनेची माहिती दिली. दरम्यान परिसरात बिबट्या मृत अवस्थेत आढळून आल्याची वार्ता गावात पसरल्याने शेतात नागरिकांनी गर्दी केली होती. सायंकाळी उशीरा पर्यत वनविभागाचे अधिकारी अथवा कर्मचारी कोणीच शेतात पोहचले नसल्याचे कळून आले. दरम्यान काही दिवसांपूर्वी मोड येथेच एक बिबट्या मृत अवस्थेंत आढळून आला होता. बिबट्यांचा झुंजीत त्या बिबट्याचा मृत्यू झाल्याचे त्यावेळी वनविभागाने म्हटले होते. आता पुन्हा आज एक बिबट मृत अवस्थेंत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून आता हा दुसरा बिबट्या कसा मृत झाला असावा याविषयी तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. बिबटय़ाचा आठ दिवसांपूर्वी मृत झाला असावा कारण परिसरात दूर्गंधी पसरली होती. बिबटय़ाचे मृत शरीर सर्व गळून गेले आहे. असे शेतकरी अंदाज व्यक्त करत होते.

बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर शहरातील प्रताप बेंद्रे यांचा राष्ट्रीय महामार्गावर आढळला मृतदेह

Next Post

प्रहार शिक्षक संघटनेतर्फे प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्‍नांसंदर्भात बिडीओंना निवेदन

Next Post
प्रहार शिक्षक संघटनेतर्फे प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्‍नांसंदर्भात बिडीओंना निवेदन

प्रहार शिक्षक संघटनेतर्फे प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्‍नांसंदर्भात बिडीओंना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add