Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्ह्यातील माध्य. शाळांतील मुख्याध्यापकांसाठी शैक्षणिक मार्गदर्शक पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

team by team
December 22, 2021
in शैक्षणिक
0
नंदुरबार जिल्ह्यातील माध्य. शाळांतील मुख्याध्यापकांसाठी शैक्षणिक मार्गदर्शक पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

नंदुरबार l प्रतिनिधी
मुख्याध्यापकांना शैक्षणिक कामकाज करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मुख्याध्यापकांचे प्रशासकीय कामकाज सुलभ होण्यासाठी, नंदुरबार जिल्हा निर्मितीनंतर प्रथमतः माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकांसाठी “शैक्षणिक मार्गदर्शक पुस्तिका सन 2021- 22” ची निर्मिती करण्यात आली.

नंदुरबार जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी यांचे संक्षिप्त कार्यभार, वर्षभराचे नियोजन,शाळा पातळीवरील विविध समित्या व त्यांचे कामकाज,शालेय अभिलेख, इयत्ता निहाय तासिका वाटप नियोजन,इ.5 वी ते इ.10 वी वर्गांचे मूल्यमापन तक्ते, रजेचे प्रकार,मुख्याध्यापकांचे कर्तव्य व जबाबदाऱ्या,महत्वाचे शासन निर्णय व परिपत्रके अशा विविधांगी विषयांचे एकत्रित संकलन करून नंदुरबार जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ,नंदुरबार यांच्या संयोजनाद्वारे श्री.आप्पासो.आ.ध.देवरे माध्यमिक विद्यालय विखरण ता. जि.नंदुरबार विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.डी.साळुंके यांच्या संकल्पनेतून शैक्षणिक मार्गदर्शक पुस्तिकेची निर्मिती करण्यात आली. जि.प. नंदुरबार येथील सभागृहात मान्यवरांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन करण्यात आले.या कार्यक्रमाला जि.प. अध्यक्षा अँड.सीमा वळवी,मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे,शिक्षण व आरोग्य सभापती अजित नाईक कृषी व पशुसंवर्धन सभापती गणेश पराडके तसेच महाराष्ट्र राज्य माध्य. व उच्च माध्य. शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे,अध्यक्ष जे. के.पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.मच्छिंद्र कदम, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी, प्राथ. उपशिक्षणाधिकारी भानुदास रोकडे, डॉ.युनूस पठाण माध्य.उपशिक्षणाधिकारी चंद्रकांत पाटील,मुख्याध्यापक संघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष,सुनील भामरे नंदुरबार जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष, मुकेश पाटील,सचिव,पुष्पेंद्र रघुवंशी तसेच मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी व जिल्ह्यातील मुख्याध्यापक उपस्थित होते.
जि.प.अध्यक्षा अँड.सीमा वळवी यांनी पुस्तिका साकारणारे डी.डी. साळुंके यांचा गौरव केला‌. व आपल्या मनोगतातून माध्यमिक शाळेसाठी “शैक्षणिक मार्गदर्शक पुस्तिक’ दैनंदिन कामकाज करताना मुख्याध्यापकांना निश्चितच उपयोग होईल असे सांगितले.
तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी आपल्या मनोगतातून “शैक्षणिक मार्गदर्शक पुस्तिका” शाळेसाठी व मुख्याध्यापकांसाठी प्रशासकीय दैनंदिन कामकाज सुलभ होणे साठी पुस्तिकेतील मार्गदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्ह्यातील मुख्याध्यापकांना केले.

बातमी शेअर करा
Previous Post

दहा वर्षात एकरकमी चांगला दर आयान शुगरने मांडले जिल्हाधिकाऱ्यांकडे म्हणणे

Next Post

सारंगखेडा येथे २३ डिसेंबर पासून अश्व सौदर्य स्पर्धांचे आयोजन

Next Post
सारंगखेडा येथे २३  डिसेंबर पासून अश्व सौदर्य स्पर्धांचे आयोजन

सारंगखेडा येथे २३ डिसेंबर पासून अश्व सौदर्य स्पर्धांचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add