नंदुरबार येथील सरदार पटेल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अभिनव विद्यालयातील उपशिक्षक उपशिक्षक रमेश श्रावण मलखेडे यांना दि. 20 डिसेंबर 2021 रोजी मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई यांच्यातर्फे राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गौरव पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले.
नाशिक येथे रमेश आव्हाड सुप्रसिध्द साहित्यिक तसेच ह.भ.प. श्यामसुंदर महाराज सोन्नर आळंदीकर व महापरिषद समन्वयक प्रकाश सावंत यांच्या हस्ते उपशिक्षक रमेश मलखेडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. रमेश मलखेडे हे नंदुरबार येथील अभिनव विद्यालयात गेल्या 27 वर्षापासून दैनंदिन अध्यापनाचे कार्य करीत आहेत. मलखेडे हे विद्यार्थीप्रिय शिक्षक असून स्वतंत्र विचाराचे तसेच समाज प्रिय शिक्षक आहेत. त्यांनी आजपर्यंत अनेक विद्यार्थी घडवले आहेत. त्यांचे सामाजिक कार्य ही तसेच मोठे असुन समाजातील विविध विद्यार्थ्यांना व लोकांना ते मार्गदर्शन करीत असतात. समाजातील गोरगरीब जनतेच्या मुलांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत असतात तसेच समाजातील विविध कार्यक्रमांसाठी त्यांची उपस्थिती असते. गुणगौरव समारंभ असेल किंवा समाजातील विविध सांस्कृतिक कार्यक्रम असतील, सामाजिक मिळावे असतील यासाठी सरांचा पुढाकार असतो. ग्रामीण भागातून येणार्या विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञानाची गंगा घरोघरी पोहोचविण्यासाठी रमेश मलखेडे यांचे अहोरात्र प्रयत्न सुरू असतात आणि या सर्वांचा परिपाक म्हणून त्यांना मुंबई येथील मनुष्यबळ विकास लोकसेवा आकादमी यांनी त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार सन्मानाने नाशिक येथे उपशिक्षक रमेश मलखेडे यांचा सन्मान करण्यात आला.








