Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धडगाव नगरपंचायतिच्या १७ जागांसाठी 79. 84 टक्के मतदान, मतदानात महिलांचे प्रमाण अधिक, मतदान प्रक्रिया शांततेत

team by team
December 21, 2021
in राजकीय
0
धडगाव नगरपंचायतिच्या १७ जागांसाठी 79. 84  टक्के मतदान, मतदानात महिलांचे प्रमाण अधिक, मतदान प्रक्रिया शांततेत

नंदूरबार l प्रतिनिधी
धडगाव वडफळ्या रोषमाळ बु. नगरपंचायतिच्या १७ जागांसाठी 79. 84 टक्के मतदान झाले.यावेळी 3 हजार पुरुषांनी तर 3 हजार 6 महिला अशा एकुन 6 हजार 6 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.
धडगाव वडफळ्या रोषमाळ बु. नगरपंचायतिच्या १७ जागांसाठी आज मतदान घेण्यात आले. नगरपंचायतिच्या मतदानासाठी सतरा मतदान केंद्र नियुक्त करण्यात आली होती.सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.या निवडणुकीत ४८ उमेदवार आपलें नशीब आजमावत आहे. मतदान प्रक्रियेत नगरपंचायतिच्या १७ वार्डातील एकूण ७ हजार ५२३ मतदार होते.यात पुरुष मतदार ३ हजार ७११ व स्त्री मतदार ३ हजार ७१२ होते. आज सकाळी ७.३० वाजेपासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली.सकाळी ७.३० ते ९.३० वाजेपर्यंत १४.९४ टक्के मतदान झाले होते.तर ११.३० वाजेपर्यंत ३७.८७ टक्के मतदान झाले होते.दुपारी १. ३० वाजेपर्यंत ६०. ४२ टक्के तर ३.३० वाजेपर्यंत तब्बल ७४.५८ टक्के मतदान झाले.
धडगाव नगरपंचायतीसाठी एकूण 79. 84 टक्के मतदान झाले.यात 3 हजार पुरुषांनी तर 3 हजार 6 महिला अशा एकुन 6 हजार 6 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
धडगांव नगरपंचायतीसाठी १७ मतदान पथक नियुक्त करण्यात आले होते, तसेच ८ मतदान पथक राखीव ठेवण्यात आले होते. या प्रक्रियेत १७ मतदान केंद्रावर एकूण १०२ मतदान कर्मचारी व प्रत्येक केंद्रावर एक पोलीस कर्मचारी याप्रमाणे एकूण १७ पोलीस कर्मचारी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आले होते. या निवडणुकीसाठी तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला.यात १ उपविभागीय पोलीस अधिकारी, २ पोलीस निरीक्षक,६ एपिआय व पीएसआय, ६२ पुरुष पोलीस कर्मचारी, १२ महिला पोलीस कर्मचारी, ५६ पुरुष होमगार्ड तर १९ महिला होमगार्डचा समावेश होता. दरम्यान धडगांव येथील नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी शांततेत मतदान पार पडले. शहरात सर्वत्र शांतता असून कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनंत जवादवार,निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. चेतन गिरासे, तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांनी दिली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा येथे भाजपाचा प्रांताधिकारी कार्यलयावर मोर्चा, अतिक्रमितधारक शेतकर्‍यांना अपात्रतेच्या बजावलेल्या नोटीसा मागे घेवून पुन्हा पडताळणी करण्याचे ठोस आश्वासनानंतर मोर्चेकरी फिरले माघारी

Next Post

उपशिक्षक रमेश मलखेडे राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मानित

Next Post
उपशिक्षक रमेश मलखेडे राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मानित

उपशिक्षक रमेश मलखेडे राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मानित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add