नंदुरबार । प्रतिनिधी
शहरालगत असलेल्या होळतर्फे हवेली ता.नंदुरबार येथे भव्य महादेव व हनुमान मंदिराच्या भूमीपुजनाचा सोहळा सोमवारी मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात झाला. भुमीपूजनानिमित्त परिसरातील यजमान जोडप्यांच्या हस्ते व पुरोहितांच्या उपस्थितीत विधीवत कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते मंदिर भुमीपूजनाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी नंदुरबार पालिकेचे प्रभारी नगराध्यक्ष रविंद्र पवार, ड्रीम कन्स्ट्रक्शनचे किरण तडवी, समीर पवार, हिरालाल चव्हाण, ग्रा.पं.चे सरपंच व उपसरपंच, सदस्य तसेच परिसरातील होळतर्फे हवेली व गुरूकुल नगरवासी उपस्थित होते. याप्रसंगी देवतांच्या फोटो प्रतिमेचे पूजन करून विधीवत कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. सदर मंदिराचे बांधकाम ग्रामपंचायत निधीतून होत असून यामुळे ग्रामस्थांचे आनंद व्यक्त करण्यात येत आहे.








