Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यातून शेकडो डी.सी.पी.एस. धारक जाणार मुंबई येथे पेंशन मार्चसाठी

team by team
December 20, 2021
in राज्य
0

म्हसावद l प्रतिनिधी
1नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय सेवेत नियुक्त होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाने  परिभाषित अंशदान निवृत्ती योजना लागू केली आहे. वेतन कपातीवर आधारित व शेअर बाजारावर अवलंबून असणाऱ्या या योजनेला कर्मच्यार्यांचा तीव्र विरोध आहे. ही भांडवलशाही योजना मागे घेवून कर्मच्याऱ्याना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन योजना लागू करावी या मागणीसाठी सर्व कर्मचारी मागील दशकापासून लढा देत आहे. मागील १६ वर्षात या योजनेतील हजारो कर्मचारी मयत झाले आहे. शेकडो कर्मचारी निवृत्त झाले आहेत. त्या कर्मच्याऱ्याना निवृती वेतन नामक कोणतेही लाभ या योजनेतून मिळत नाहीत. यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटन ने सदर योजने विरुद्ध रणशिंग पुकारले आहे. व यावेळी राज्यातील सर्वच कर्मचारी संघटना यांनी साथ देत जुनी पेन्शन हीच एकमेव मागणी शासनाकडे केली आहे. सदर आंदोलनाचा पहिला टप्पा  म्हणून पेन्शन संघर्ष यात्रा प्रत्तेक जिल्हा जिल्ह्यात जावून कर्मचारी यांची जागृती करत आली. आता 21 डिसेंबर ते 24 डिसेंबर ग्राम पडघा कल्याण ते विधानभवन मुंबई पेंशन मार्च आयोजित करण्यात आला आहे. या पेंशन मार्चला नंदुरबार जिल्ह्यातील सर्व कर्मचारी व विविध संघटनेचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन नंदुरबार जिल्हाध्यक्ष संदिप रायते यांनी केले आहे.

कर्मच्याऱ्याचा जुनी पेन्शन या मागणीसाठी राज्यस्तरावरील सर्व संघटना एकत्र आल्या आहेत. कर्मचारी जीवनात झालेल्या सर्वात मोठ्या या अन्यायाच्या विरोधात लढणे, संघर्ष करणे हे प्रत्तेक कर्मच्याऱ्याचे कर्तव्य आहे. जुनी पेन्शन ही कर्मच्याऱ्याना संघर्षातूनच मिळणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटन चे राज्य पदाधिकारी व राज्यातील सर्व कर्मचारी संघटनाचे प्रतिनिधी यात्रेत सहभागी झाले होते. आपल्या हक्काच्या जुनी पेन्शन साठी होत असलेल्या पेंशन मार्च ला सर्व कर्मच्याऱ्यानी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा कार्यकारीणी मार्फत करण्यात आले आहे. सदर पेंशन मार्च ला राहुल पवार, संदीप रायते, तुषार सोनवणे, शैलेंद्र रघुवंशी, गजानन मराठे, मंगेश वाघमारे, अशोक बागले, संदिप रोकडे, चंद्रकांत वाघ, चुडामण सरगर, प्रमोद राजपूत, विजय वळवी, ज्ञानोबा सुरनर, अनिल माळी, यशवंत सूर्यवंशी, कमलेश राजपूत, आबासाहेब अहिरे, दयानंद जाधव, आदिनाथ गोल्हार, धिरसिंग वसावे, प्रविण मासुळे, पंकज होडगर, प्रविण परदेशी, वाघंबर कदम, विशाल सिसोदे, अनिल चिकटे, हेमंत बोरसे, ओंकार आकुसकर, माणिक चाटे, अनुप राठोड, प्रविण पगारे, प्रशांत बागुल, निलेश पाटील, तुषार पाटील, स्वप्निल बागल, दिलीप पावरा, आंतरसिंग तडवी, राजेंद्र वसावे, अमित अहिरराव, कैलास खोंडे, महेश पाटील, राकेश जगताप, सुरेश हुरेज, मनोज कोळी, संतोष पावरा, पुष्पेंद्र सूर्यवंशी, ज्ञानोबा सुरनर, तुकाराम अलट आदींसह शेकडो डी.सी.पी.एस.धारक उपस्थित असणार आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

आदिवासी भागात कार्यरत प्राथमिक शिक्षकांना एकस्तर वेतननुसार लाभ मिळावा खा. डॉ.हिना गावीत यांच्या कडे प्रहार शिक्षक संघटनेची मागणी

Next Post

राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न पुरस्काराने सीएचओ डॉ. दिपक साटोटे सन्मानित

Next Post
राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न पुरस्काराने सीएचओ डॉ. दिपक साटोटे सन्मानित

राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न पुरस्काराने सीएचओ डॉ. दिपक साटोटे सन्मानित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add