नंदुरबार l प्रतिनिधी
कर्नाटक मधील बंगळुरु येथील घटनेचा नंदूरबार येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून निषेध व्यक्त करण्यात आला.
कर्नाटक राज्यातील बंगळुरु येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची केलेल्या विटंबनाचा सर्व स्तरातून निषेध नोंदविण्यात येत आहे; नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी युवक पदाधिकारी तसेच शिवप्रेमींच्या वतीने नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये झालेल्या घटनेचा निषेध करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शतशः नमन करून दुग्धाभिषेक करण्यात आला. नंदुरबार शहरातील जुने नगरपालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पदाधिकार्यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला.


तर शहादा तालुक्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नमन करून दुग्धाभिषेक करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व शिवप्रेमी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा जयघोष करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे, युवा नेते ॲड. राहु मोरे, जिल्हा सरचिटणीस व संघटक जितेंद्र कोकणी, शहराध्यक्ष नितीन जगताप, युवक शहराध्यक्ष लल्ला मराठे, युवक राष्ट्रवादीचे सुरेश वळवी, कल्लू पैलवान, प्रमोद महाजन, राजा ठाकरे, निलेश चौधरी यांच्यासह असंख्य शिवप्रेमी उपस्थित होते.









