Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या देशविघातक संघटनेवर बंदी घाला; हिंदू जनजागृती समितीचे निवेदन

team by team
December 18, 2021
in राज्य
0
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या देशविघातक संघटनेवर बंदी घाला; हिंदू जनजागृती समितीचे निवेदन

नंदुरबार l प्रतिनिधी
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या देशविघातक संघटनेवर भारतात बंदी घालावी तसेच संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांवर देशद्रोह आणि आतंकवादी कारवायांमध्ये सहभाग घेतल्याबद्दल गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी; अशी मागणी करणारे निवेदन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या सर्व कार्यालयांना टाळे ठोकून त्यांची सर्व बँक खाती गोठवण्यात यावीत. ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ची सखोल चौकशी करून त्यांचे कोणकोणत्या आतंकवादी संघटनांशी संबंध आहेत, त्यांना विदेशातून मिळणारा निधी, त्यांची आगामी षड्यंत्रे आदींचा शोध घेऊन आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी या निवेदनात केली आहे. भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना ऊद्देशून असलेले हे निवेदन निवासी जिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना देण्यात आले. निवेदन देतांना हिंदू जनजागृती समितीचे सतीश बागुल, आकाश गावित, जितेंद्र मराठे, जय पंडित उपस्थित होते.
‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या देशविघातक संघटनेने केलेल्या गंभीर गुन्ह्यांची सविस्तर माहिती देतांना म्हटले आहे की, ही संघटना अत्यंत जहाल असून देशातील धार्मिक सलोखा आणि सामाजिक शांतता यांसाठी अत्यंत धोकादायक आहे.
वर्ष 2012 मध्ये केरळ शासनाने ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ विषयी केरळ उच्च न्यायालयाला माहिती देतांना सांगितले आहे की, ही संघटना देशाच्या सुरक्षितेच्या दृष्टीने अत्यंत घातक असून ‘स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया’ अर्थात् ‘सिमी’चे पुनरुज्जीवन करण्याचा प्रकार आहे.’ ‘सिमी’वर केंद्रशासनाने आतंकवादी संघटना म्हणून बंदी घातलेली आहे. या संघटनेचा विविध इस्लामिक आतंकवादी संघटनांशी संबंध असणे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघटनेच्या 27 लोकांचा खून करणे, 86 जणांच्या खुनाचा प्रयत्न करणे आणि धार्मिक हिंसाचार करणे, असे विविध गुन्हे दाखल आहेत. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चे सदस्य फेसबुकवर ‘इसिसचे सहानुभूतीदार म्हणून उघडकीस आले आहेत आणि हरकतउल जिहाद अल-इस्लामी’, ‘हिजबुल मुजाहिद्दीन’, ‘लष्कर-ए-तैय्यबा’ आणि ‘अल-कायदा’ यांच्याशीही त्यांचा संबंध असल्याचे उघड झाले आहे. नागरिकत्व सुधारण कायदा (CAA) च्या विरोधात उत्तर प्रदेश राज्यात दंगली आणि हिंसाचार घडवल्याप्रकरणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या 108 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने या संघटनेवर बंदी घालण्याच्या दृष्टीने प्रक्रिया चालू केलेली आहे. इस्लाममध्ये जबरदस्तीने धर्मांतरीत करण्याची संघटनेची योजना असल्याची कबुली दिली आहे.
या निवेदनामध्ये पुढे म्हटले आहे की, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक राज्य सरकारांनी आणि कर्नाटकातील खासदारांनी केंद्र सरकारकडे ‘पीएफआय’ वर बंदी घालण्याच्या शिफारसी आणि केरळ उच्च न्यायालयाचे निरीक्षण या बाबी या विषयाची गंभीरता स्पष्ट करतात. तरी या संदर्भात आम्ही मागणी करत आहोत की, ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ आणि तिच्याशी संबंधित सर्व संलग्न संघटनांवर तत्काळ बंदी आणावी.

बातमी शेअर करा
Previous Post

सत्काराने भारवल्या आशा,अंगणवाडी व आरोग्य सेविका, लसीकरणासाठी राबणाऱ्या यंत्रणेच्या पत्रकार संघातर्फे सन्मान

Next Post

पोषक तृणधान्याचे आहारामध्ये महत्वाची भूमिका : ॲड. सीमा वळवी

Next Post
पोषक तृणधान्याचे आहारामध्ये महत्वाची भूमिका : ॲड. सीमा वळवी

पोषक तृणधान्याचे आहारामध्ये महत्वाची भूमिका : ॲड. सीमा वळवी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add