नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील पाटी येथून अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात विसरवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर तालुक्यातील पाटी येथील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस अज्ञात व्यक्तीने काहीतरी फूस लावून पळवून नेले. याबाबत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विसरवाडी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.राजेश येवले करीत आहेत.










