Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पहिल्या टप्प्याअंतर्गत वाण्याविहीर येथे ड्रोनद्वारे गावठाण मोजणी सर्वेक्षणाला सुरवात

team by team
December 17, 2021
in राज्य
0
पहिल्या टप्प्याअंतर्गत वाण्याविहीर येथे ड्रोनद्वारे गावठाण मोजणी सर्वेक्षणाला सुरवात

नंदुरबार l प्रतिनिधी
राज्य शासनाचा महसूल, ग्रामविकास, भूमी अभिलेख विभाग व भारतीय सर्वेक्षण विभाग, डेहराडून यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार जिल्ह्यातील सर्व गावांतील गावठाणांचे ड्रोनद्वारे भूमापनाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर गावांचे ड्रोनद्वारे भूमापन मोजणी सर्वेक्षणाचा शुभारंभ आज सहायक जिल्हाधिकारी डॉ.मैनक घोष यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी भूमी अभिलेख जिल्हा अधिक्षक स्वाती लोंढे, गट विकास अधिकारी नंदकिशोर सुर्यवंशी, भाजपा अनुसुचित जमाती सेलचे प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी, पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता टी.एन.वाघ, उप अधीक्षक अ.भ.ठाकूर, सहाय्यक अभियंता वासंती बोरसे, प्राचार्य दत्तात्रय सुर्यवंशी, महादेव सुर्यवंशी, ज्ञानेश्वर देशमुख आदी उपस्थित होते.

यावेळी सहायक जिल्हाधिकारी घोष म्हणाले की, नंदुरबार जिल्ह्यातील सर्व गावांतील गावठाणांचे ड्रोनद्वारे भूमापनाचे सर्वेक्षण केले जाणार असून या सर्वेक्षणामुळे जिल्ह्यातील प्रत्येक गावातील शासनाच्या मालकीच्या मिळकतींचे संरक्षण, मिळकतींचा नकाशा व सीमा निश्चित होतील. तसेच मिळकतीचे नेमके क्षेत्र किती आहे त्याचीही नोंद होईल. ग्रामस्थांच्या नागरी हक्काचे संरक्षण होईल. गावातील रस्ते, शासनाच्या, ग्रामपंचायतीच्या खुल्या जागा, नाले यांच्या सीमा निश्चित होऊन अतिक्रमण रोखता येईल. या सर्वेक्षणामुळे ग्रामपंचायतींना गावातील कर आकारणी, बांधकाम परवानगी अतिक्रमण निर्मूलनासाठी अभिलेख व नकाशे उपलब्ध होणार आहेत. ड्रोनद्वारे भूमापन करतांना खुल्या, मोकळ्या जागा, आणि गावातील रस्ते इतर शासकीय व सार्वजनिक मिळकतीचे हक्काबाबत बाधा होणार नाही याची काळजी घ्यावी. नागरिकांनीही सर्वेक्षणासाठी यंत्रणेला सहकार्य करावे असे त्यांनी सांगितले.

यावेळी श्रीमती लोंढे म्हणाल्या की, पहिल्या टप्प्याअंतर्गत अक्कलकुवा तालुक्याची निवड करण्यात आली असून हे सर्वेक्षण एका महिन्याच्या कालावधीत पुर्ण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणात गावठाण, सरकारी मालमत्ता,ग्रामपंचायतीचे तसेच खाजगी मालमत्तेचे सर्वेक्षण होणार असून या सर्वेक्षणातून अत्यंत अचूक असा डेटा उपलब्ध होणार आहे. या सर्वेक्षणात ड्रोनच्या सहाय्याने अत्याधुनिक जीआयएस प्रणालीच्या आधारे गावठाणातील मिळकतीचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार असून सर्वेक्षण झाल्यानंतर संगणीकृत नकाशे मिळकत पत्रिका तयार होईल. याचा फायदा भविष्यात सर्व नागरिकांना होणार आहे. तरी या सर्वेक्षणात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ, नागरिक उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

नवापुर येथील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

Next Post

मृत व्यक्तीच्या नावे आधारकार्ड बनवून जमिनीची खरेदी विक्री केल्याप्रकरणी आठ जणांविरूध्द गुन्हा दाखल

Next Post

मृत व्यक्तीच्या नावे आधारकार्ड बनवून जमिनीची खरेदी विक्री केल्याप्रकरणी आठ जणांविरूध्द गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

October 19, 2026
कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

October 18, 2026
माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे  हात धुवा दिवस उत्साहात

माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे हात धुवा दिवस उत्साहात

October 18, 2026
नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

October 18, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 18, 2026
तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add