Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापुर येथील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

team by team
December 17, 2021
in क्राईम
0

नंदूरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलपाडा शिवारातील एका ऊसाचे शेतातुन शिताफीने ताब्यात घेतले
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.11 डिसेंबर रोजी नवापुर तालुक्यातील तुळजाफळी येथील एक अल्पवयीन मुलगी तिच्या गावाहुन नवापुर येथील सार्वजनिक मराठी शाळेमध्ये आली होती.शाळा सुटल्यानंतर पिडीत मुलगी पायी तिच्या घरी जात असतांना नवापुर शहरातील हॉटेल रंगुन जवळ थांबली असता एक अनोळखी मुलगा मोटार सायकलवर तिच्या जवळ येवुन तिला गाडीवर बसण्यास सांगितले, परंतु पिडीत मुलीने त्या अनोळखी मुलाच्या गाडीवर बसण्यास नकार दिला . परंतु त्या अनोळखी मुलाने सदर पिडीत मुलीला बळजबरीने गाडीवर बसवून लालबारी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या एका शेतात नेवून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला म्हणून नवापुर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता . सदर घटनेची माहिती नवापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी तात्काळ पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील , अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांना कळविली . घडलेला प्रकार अतिशय गंभीर होता , म्हणून पोलीस अधिक्षक पी . आर . पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे व नवापुर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अमंलदारांचे पथक तयार करुन त्यांना योग्य ते मार्गदर्शन व सुचना देवुन आरोपीस तात्काळ ताब्यात घेण्याबाबत आदेशीत केले . वरिष्ठांच्या वरील सुचना व मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी आरोपीताचा शोध घेण्यासाठी तात्काळ पथकास घटना घडलेल्या आजुबाजुच्या गावांमध्ये रवाना केले . परंतु स्थानिक गुन्हे शाखा व नवापुर पोलीसांकडे संशयीत आरोपीताचे फक्त वर्णन व स्प्लेंडर हिरो कंपणीची दुचाकी मोटार सायकलचा अपुर्ण व अस्पष्ट नंबर व गाडीचे निळ्या रंगाचे सिटकव्हर एवढीच माहिती पिडीत मुलीकडुन मिळालेली होती . तसेच पिडीत मुलीच्या म्हणण्यानुसार आरोपीताच्या डाव्या हातावर मागच्या बाजुला चार बाणांचे टॅटु गोंधलेले होते , इतर उपयुक्त अशी कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती त्यामुळे आरोपी निष्पन्न करुन त्यास अटक करण्याबाबतचे मोठे आव्हान पोलीसांसमोर होते . दि. 11 डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखचे व नवापुर पोलीस ठाण्याचे पथक नवापुर शहरात अल्पवयीन मुलीचा नेहमीचा येण्या जाण्याचा मार्गावरील सी.सी.टी.व्ही . फुटेजची पाहणी करीत असतांना काका वाईन शॉप परिसरातील एका दुकानाच्या सी.सी.टी.व्ही . फुटेज प्राप्त करुन त्याचे तांत्रिक विश्लेषण केले असता त्यात पिडीत मुलीला इसम हा गाडीवरुन घेवुन जातांना दिसत होता . त्या अनुषंगाने सदर मोटार सायकलस्वार याचा तपास करण्याच्या दृष्टीने नवापुर शहरातील विविध भागातील सी . सी . टी . व्ही फुटेजची पुन्हा पडताळणी केली.नवापुर शहरातील लिलवाती मॉल भागात पिडीत मुली सोबत असलेला इसम याचे मोटार सायकलवर दोन स्त्रीया बसुन नवापुर शहरात आल्याचे दिसून आले . दि. 16 डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर तसेच नवापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शबाळासाहेब भापकर हे आप – आपल्या पथकासोबत नवापुर तालुक्यात आरोपीताची माहिती घेत असतांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , 7812 ह्याच नंबरची एक मोटार सायकल केलपाडा गावात देखील आहे म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलपाडा ता . नवापुर येथे जावुन मिळालेल्या मोटार सायकलच्या नंबरची गोपणीय माहिती काढली असता पुर्ण नंबर मिळाल्याने सदर मोटार सायकल अभित उमाकांत वसावे रा . केलपाडा ता . नवापुर यांच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाल्याने अभित वसावे यांना सदर गुन्ह्याबाबत व सी.सी.टी.व्ही फुटेज दाखवुन विचारपुस केली असता त्यांनी सी.सी.टी.व्ही . फुटेजमधील मोटार सायकल ही त्यांचीच असल्याचे सांगुन मोटर सायकलस्वार त्यांचा पुतण्या अजय धर्मेंद्र वसावे यास नवापुर येथे बाजार कामासाठी दिल्याचे सांगितले व त्यादिवशी त्या मोटार सायकलवर अजयसह त्याची काकु व त्याची पत्नी निकीता असे नवापुर येथे गेल्याचे सांगितले . स्थानिक गुन्हे शाखेचे पथक केलपाडा ता . नवापुर येथे दाखल झाले असुन घटनेबाबत माहिती काढत असल्याचे आरोपी अजय वसावे यास चाहुल लागताच त्याने केलपाडा ता . नवापुर येथुन पळ काढला दि. 17 डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी अजय धर्मेंद्र वसावे रा . केलपाडा ता . नवापुर जि नंदुरबार यास केलपाडा शिवारातील एका ऊसाचे शेतातुन शिताफीने ताब्यात घेतले व सदर घटनेबाबत विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास गुन्ह्याच्या पुढील कारवाईकामी नवापुर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे . सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक पी . आर . पाटील , अपर पोलीस अधिक्षक विजय पवार , उप विभागीय पोलीस अधिकारी , नंदुरबार सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, नवापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर , सहा . पोलीस निरीक्षक संदीप पाटील , महिला सहा . पोलीस निरीक्षक नयना देवरे , पोलीस नाईक जितेंद्र ठाकुर , जितेंद्र तोरवणे , पोलीस अमंलदार अभिमन्यु गावीत , राजेंद्र काटके , दिपक न्हावी , रामेश्वर चव्हाण , रमेश साळुंखे नवापुर पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक मनोज पाटील , सहा . पोलीस उप निरीक्षक गुमानसिंग पाडवी , पोलीस हवालदार दादाभाई वाघ , पोलीस नाईक जितेंद्र चवहाण , पोलीस अमंलदार योगेश्वर तनपुरे , विनोद पराडके , विश्वास साळुंके यांच्या पथकाने केली आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यात थंडीची लाट येण्याची शक्यता-जिल्हा कृषि हवामान केंद्र

Next Post

पहिल्या टप्प्याअंतर्गत वाण्याविहीर येथे ड्रोनद्वारे गावठाण मोजणी सर्वेक्षणाला सुरवात

Next Post
पहिल्या टप्प्याअंतर्गत वाण्याविहीर येथे ड्रोनद्वारे गावठाण मोजणी सर्वेक्षणाला सुरवात

पहिल्या टप्प्याअंतर्गत वाण्याविहीर येथे ड्रोनद्वारे गावठाण मोजणी सर्वेक्षणाला सुरवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add