Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रजाळे गावात झालेल्या खुन प्रकरणात तिनही आरोपीतांना सत्र न्यायालयाने ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

team by team
December 16, 2021
in क्राईम
0

नंदुरबार | प्रतिनिधी

किरकोळ भांडणावरुन तरुणास लाथाबुक्कयांनी मारहाण करुन जिवेठार मारणार्‍या रजाळे ता . जि . नंदुरबार येथील तिनही आरोपीतांना  नंदुरबार सत्र न्यायालयाने जन्मठेपेची व प्रत्येकी रुपये १० हजार  दंडाची शिक्षा ठोठावली आहे .
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.२२ जुलै २०१८ रोजी दुपारी ३ ते ३.३० वाजेच्या सुमारास रजाळे ता.जि.नंदुरबार या गावात महाराणा प्रताप फलकाचे बाजुला रस्त्याजवळ घडली होती . फिर्यादी सुरेश सोनु कोळी  रा.रजाळे ता  नंदुरबार  हे दि . २२ जुलै २०१८ रोजी शेतातुन काम आटपुन दुपारी १२.३० वाजता घरी आले होते . दरम्यान ३ ते ३.३० वाजता त्यांच्या मामाचा मुलगा े गोपाल आनंदा कोळी हा घरी आला व सुरेश कोळी यांना सांगितले की , तुमचा भाऊ अरुण सोनु कोळी यास आरोपी  मंगलसिंग उर्फ नथा ठाणसिंग गिरासे, रजेसिंग उर्फ रावसाहेब ठाणसिंग गिरासे, प्रविण झुलालसिंग गिरासे असे महाराणा प्रताप फलकाजवळ लाथा – बुक्कयांनी मारहाण करत आहेत . म्हणुन फिर्यादी सुरेश सोनु कोळी व त्यांना माहिती देणारा त्यांच्या मामाचा मुलगा गोपाल कोळी असे अरुण यास सोडविण्यास गेले होते . त्यावेळेस त्यांना पाहुन आरोपी क्र . १ ते ३ असे पळुन गेले . त्यानंतर सुरेश सोनु कोळी हे त्यांच्या भावाजवळ गेले असता पिडीत अरुणचा श्वास बंद झालेला होता , त्याचे डोळे उघडत नव्हते . म्हणुन फिर्यादी यांना समजले की , लहान भाऊ अरुण यास वरील तिनही आरोपीतांनी किरकोळ भांडणावरुन नाजुक भागावर लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जिवेठार मारले आहे . अश्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता . सदर खटल्याची सुनावणी  राजेश एस . तिवारी , प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश  नंदुरबार यांचे कोर्टात होवुन आरोपी मंगलसिंग उर्फ नथा ठाणसिंग गिरासे, रजेसिंग उर्फ रावसाहेब ठाणसिंग गिरासे, प्रविण झुलालसिंग गिरासे सर्व रा.रजाळे ता.जि. नंदुरबार यांच्या विरुध्द सर्व कलमान्वये गुन्हा शाबीत झाल्याने न्यायालयाने तिनही आरोपीतांना जन्मठेपेची व प्रत्येकी रुपये १० हजार दंडाची शिक्षा सुनावली आहे . सदर खुनाचे खटल्यात एकुण ८ साक्षीदार तपासले असुन पैकी ३ प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या आहेत . वरील गुन्हयाचा सखोल तपास करुन आरोपीतांविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र सपोनि  गणेश टी . पवार यांनी सादर केले होते . खटल्याचे कामकाज अभियोग पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील ऍड . श्री . विजय सी . चव्हाण यांनी पाहीले असुन खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोहेकॉ नितीन सावळे व पोना  गिरीष पाटील यांनी कामकाज केले आहे . तपास अधिकारी व त्यांचे पथक आणि सरकारी वकील यांचे पोलीस अधीक्षक , नंदुरबार पी . आर . पाटील व अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी अभिनंदन केले आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

ग्रामपंचायत प्रभाग रचनेचे दिलेले कामकाजात टाळाटाळ केल्याप्रकरणी प.स.च्या अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

नंदूरबार जिल्ह्यात १ कोटी २० लाख रुपयांची वीजचोरी, २ हजार ६७६ प्रकरणात ग्राहकांना ७ कोटी ५३ लाखांची देण्यात आली बिले

Next Post
अक्कलकुव्यात साडेतीन लाख रुपयांची वीज चोरी उघड

नंदूरबार जिल्ह्यात १ कोटी २० लाख रुपयांची वीजचोरी, २ हजार ६७६ प्रकरणात ग्राहकांना ७ कोटी ५३ लाखांची देण्यात आली बिले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add