Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महाराष्ट्र पर्यटन विभागातर्फे कृषी पर्यटन धोरणांतर्गत नोंदणी करण्याचे आवाहन

team by team
December 16, 2021
in राज्य
0

नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र पर्यटन संचालनालयामार्फत कृषी पर्यटन धोरणांतर्गत कृषी पर्यटन केंद्रांसाठी नोंदणीला सुरवात करण्यात आली आहे. इच्छुकांनी नोंदणी करावी, असे आवाहन पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक मधुमती सरदेसाई- राठोड यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये ही माहिती केले आहे.

राज्य शासनाचे कृषी पर्यटन धोरण 28 सप्टेंबर 2020 रोजी जाहीर झाले आहे. त्यानुसार ऑनलाइन नोंदणी अर्ज पर्यटन विभागाच्या www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कृषी पर्यटन धोरणांतर्गत नोंदणीसाठी किमान एक एकर शेती क्षेत्र असणारे वैयक्तिक शेतकरी, कृषी सहकारी संस्था, शासन मान्यता प्राप्त कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालये, विद्यापीठ किंवा शेतकऱ्यांनी स्थापन केलेली भागिदार संस्था या धोरणांतर्गत नोंदणी करू शकतात.

नोंदणी शुल्क पाच वर्षांसाठी अडीच हजार रुपये आहे. नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे अशी : अर्जदाराच्या जमिनीची कागदपत्रे (सातबारा उतारा, 8 अ), आधार व पॅन कार्ड, वीज बिल, ऑनलाइन पद्धतीने www.gras.mahakosh.gov.in या संकेतस्थळावर अडीच हजार रुपये नोंदणी शुल्क भरुन त्या चलनाची प्रत, अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत परवाना.

कृषी पर्यटन धोरण नोंदणीचे फायदे असे : शेतीला पूरक व्यवसाय, रोजगाराचे नवीन साधन, पर्यटन विभागातर्फे नोंदणी प्रमाणपत्र, नोंदणीकृत पर्यटन केंद्रास पर्यटन धोरणांतर्गत प्रोत्साहन उदा. वस्तू व सेवाकर, विद्युत शुल्काचा लाभ घेता येईल. शेततळे योजनेकरीता प्राधान्य, ग्रीन हाऊस, फळबाग, भाजीपाला लागवड सारख्या योजनांचे लाभ घेता येतील. घरगुती गॅस जोडणी वापरता येईल. शासनाकडून अनुभवी प्रशिक्षकांमार्फत प्रशिक्षण देण्यात येईल. पर्यटन संचालनालयामार्फत कृषी पर्यटन केंद्राची प्रसिध्दी करण्यात येईल. मार्केटिंगसाठी पर्यटन विभागाकडून मार्गदर्शन, आठ खोल्यांपर्यंतच्या केंद्रासाठी खोल्यांच्या बांधकामासाठी नगररचना विभागाच्या परवानगीची आवश्यकता नाही.

नोंदणीसंदर्भात अधिक माहितीसाठी संपर्काचा पत्ता असा : पर्यटन संचालनालय, उपसंचालक कार्यालय, पर्यटन भवन, शासकीय विश्रामगृह आवार, गोल्फ क्लब मैदान, नाशिक, दूरध्वनी क्रमांक : 0253- 2570059,2579352 ईमेल आय.डी ddtouism.nashik-mh@gov.in, संकेतस्थळ-www.Maharashtr atourism.gov.in असा आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

महाराष्ट्र पर्यटन विभागातर्फे मान्यताप्राप्त टूर गाइडचे प्रशिक्षण

Next Post

रेल्वेची मंजुरी असतांना शहरातील बोगद्याचे काम अपूर्ण कसे : माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा सवाल

Next Post
रेल्वेची मंजुरी असतांना शहरातील बोगद्याचे काम अपूर्ण कसे : माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा सवाल

रेल्वेची मंजुरी असतांना शहरातील बोगद्याचे काम अपूर्ण कसे : माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा सवाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add