नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्हयात तळोदा येथे आज एकाचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आढळला आहे.
आज नंदुरबार प्रशासनातर्फे 94 जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली.त्यात तळोदा येथील एकाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. जिल्ह्यात सध्या आठ रुग्ण आहेत.तर तळोदा तालुक्यात 4 रुग्ण आहेत.जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढू नये यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच लसीकरण करून घ्यावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.










