नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात जिल्हा पोलीस दलातर्फे दि.११ डिसेंबर रोजी रात्री जिल्ह्यात पोलीस दलातील ५० अधिकारी व ३६८ अमंलदार नेमुन ऑपरेशन ऑल आऊट,कोंबींग/नाकाबंदी करीत मालमत्ते विरध्दच्या शहादा शहरासह तालुक्यातील १४,नंदुरबार शहरातील ९ गुन्हे उघडकीस करीत ५ जणांना अटक केली आहे. दारू पिवुन वाहण चालविणार्या २८ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नंदुरबार तालुक्यात मांडुळ सह १५ लाख २९ हजाराचा माल जप्त करीत तीन जणांना अटक करण्यात आली.चोरी करण्याच्या उद्देशाने फिरणार्या सात जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.तसेच ११ फरार आरोपींना अटक रण्यात आली असुन ३० दारूबंदीचे गुन्ह दाखल करण्यात आल आहे. पोलीस दलाच्या या कारवाईने गुन्हेगारांचे धाबे दनाणले आहे.
मागील काळात महाराष्ट्रात काही ठिकाणी दोन गटात झालेल्या जातीय दंगलीच्या पार्श्वभुमीवर समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर अंकुश राहावा तसेच आगामी येणारे सण उत्सव भयमुक्त वातावरणात पार पाडावेत यासाठी खबरदारी म्हणून नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांचे नेतृत्वाखाली दि.11 डिसेंबरच्या रात्री नंदुरबार जिल्ह्यात ऑपरेशन ऑल आऊट राबवत नाकाबंदी करण्यात आली होती.ऑपरेशन ऑल आऊटचा मुख्य उद्देश हा आगामी काळात साजरे होणारे सणांच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करुन शांतता भंग करण्याच्या विचारात असणारे समजाकंटक व गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा असा होता.


त्या अनुषंगाने ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान पोलीस ठाणे अभिलेखावरील सराईत गुन्हेगार, फरार, पाहिजे, फेर अटक आरोपी, हिस्ट्रीशिटर्स, गँग हिस्ट्रीशिटर्स, अवैध शस्त्रे बाळगणारे, रात्री घरफोडी करण्याच्या उद्देशात असलेले, चोरीच्या वस्तू बाळगणारे, रात्री संशयीतरीत्या फिरणारे, दारू पिऊन वाहन चालविनारे, कारागृहातुन सुटुन आलेले आरोपीतांचा शोध घेवुन जास्तीत जास्त गुन्हेगार ताब्यात घेवुन त्यांच्याविरुध्द् कायदेशीर कारवाई करण्याबाबतच्या तसेच मालमत्तेविरुध्द्चे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना जिल्हा पोलीस अधीक्षक, पी.आर.पाटील यांनी सर्व उप-विभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिल्या होत्या.
दि. 11 डिसेंबरच्या रात्री ऑपरेशन ऑल आऊट सुरु करण्यात आले.यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील 50 अधिकारी व 368 अमंलदार नेमण्यात आले होते व संपुर्ण ऑल आऊटचे नेतृत्व पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील स्वत: करुन नाकाबंदी / कोंबींग ऑपरेशन / ऑपरेशन ऑल आऊट बाबत जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना भेटी देत होते. पोलीस उप-अधीक्षक (मुख्यालय) विश्वास वळवी, उप विभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार सचिन हिरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, शहादा श्रीकांत घुमरे, सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर असे सर्व आप-आपल्या पथकाचे नेतृत्व करुन कारवाई करीत होते.
ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान 28 इसम दारु पिवून वाहन चालवितांना मिळुन आल्याने त्यांच्या विरुध्द् नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांना मोटार वाहन कायदा कलमान्वये 28 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहादा पोलीस ठाणे अभिलेखावरील 5 ना उघड घरफोडीचे गुन्ह्यातील इनव्हर्टर, बॅटरी, ऍ़म्प्लीफायर, एल. ई.डी.टीव्ही, तिखोरा ता.शहादा येथील पदमावत माता मंदीतील देवीच्या गळ्यातील सोन्याचे मंगसुत्र असा मुद्देमाल, व 50 हजार रुपये किमंतीची एक मोटार सायकल, चोरीचा गुन्हा असे शहादा पोलीस ठाणे अभिलेखावरील 6 गुन्हे उघडकिस आणुन 4 आरोपीतांकडुन 1 लाख 62 हजार 800 रुपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे शहादा पोलीस ठाणे हद्दीतील लोहारा गावातील शानाभाऊ ओंकार माळी यांचे शेतातील 3 हजार 200 रु. कि. चे कापसाच्या तीन गोण्या 160 कि. ग्रॅ. वजनाच्या कापुस चोरीचा गुन्हा देखील उघडकिस आणुन आरोपीताकडुन 3 हजार 200 रु. कि. चे कापसाच्या तीन गोण्या 160 कि. ग्रॅ. वजनाचा कापुस हस्तगत करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने मालमत्ते विरुध्द्चे एकुण 8 गुन्हे उघडकिस आणुन 1 लाख 38 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन 05 आरोपीतांना ताब्यात घेतलेले आहे.
नंदुरबार शहर पोलीस ठाणे अभिलेखावरील वायर चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीतास ताब्यात घेवुन 30 हजार रुपये किमंतीची थ्रीफेज वायर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच म्हसावद पोलीस ठाणे हद्दतील सुलवाडे जिल्हा परिषद शाळेतील घरफोडीचा गुन्ह्यातील 3 हजार रुपये किमंतीचे 2 सिलेंडर हस्तगत करण्यात आलेले आहेत. असे एकुण मालमत्तेविरुध्द्चे एकुण 9 गुन्हे उघडकिस आणुन एकुण 1 लाख 92 हजार 800 रुपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
तसेच कोंबिग ऑपरेशन दरम्यान नंदुरबार ते दोंडाईचा रोडवर कृषी महाविद्यालय जवळ मांडुळ जातीचा सर्प विक्री करण्याच्या उद्देशाने चारचाकी वाहनासह 3 आरोपी मिळुन आल्याने त्यांच्याकडून 10 लाख रुपये किमंतीचा 4 कि.ग्रॅ. वजनाचा 1 मांडुळ (सर्प) व 5 लाख 29 हजार रुपये किमंतीचा इतर मुद्देमाल असा एकुण 15 लाख 29 हजार रु.किं.चा मुद्देमाल हस्तगत करण्यात येवुन त्यांच्या विरुध्द् वन्य जिव प्राणी सरंक्षण अधिनियमान्वये नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
चोरी करण्याच्या उद्देशाने तसेच स्वत:चे अस्तीत्व लपवुन संशयास्पदरीत्या फिरत असतांना मिळुन आलेले 12 रेकॉर्डवरील आरोपीतांविरुध्द् महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122 प्रमाणे विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्याकडून चोरी करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य हस्तगत करण्यात आले.
7 संशयीत इसमांच्या ताब्यात मिळुन आलेल्या मालमत्ते बाबत समाधानकारक उत्तरे न दिल्याने त्यांच्या विरूद्ध जिल्ह्यातील विविध पोलीस पोलीस ठाण्यांमध्ये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 124 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच नंदुरबार शहर, धडगांव,सारंगखेडा पोलीस ठाणे अभिलेखावरील फरार असलेल्या 11 आरोपीतांना देखील ताब्यात घेण्यात आले त्यांना न्यायालयात पाठविण्यात आले आहे.
ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान 30 दारुबंदीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये 1 लाख 46 हजार 464 रुपये किमंतीची देशी विदेशी दारु,बियर असा मुद्देमाल व 65 हजार रुपये किमंतीची अवैध दारुची वाहतुक करणेकामी वापरण्यात आलेले चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे. तसेच धडगांव गावात बस स्थानकासमोर महाराष्ट्रात प्रतिबंधीत केलेला 37 हजार 290 रुपये किमंतीचा विमल गुटखा व 53 हजार रुपये किंमतीचे वाहन असा एकुण 90 हजार 290 रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने एका आरोपीविरुध्द् धडगांव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
तसेच नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील वैंदाणे गावातून शासनाची कुठलीही परवानगी नसतांना दोन आरोपी वाळुची चोरटी वाहतुक करतांना मिळुन आल्याने आरोपीतांच्या ताब्यातुन एक ब्रास वाळु, 3 लाख 53 हजार रु. कि. सोनालीका कंपनीचे निळया रंगाचे ट्रक्टर (क्र. MH-18 BC-2202,) 1200 रु. कि. 6 प्लास्टीकच्या तगाऱ्या व 6 फावडे असा एकुण 3 लाख 54 हजार 200 रु.किं.चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन दोन्ही आरोपीतांविरुध्द् नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडुन गुन्हेगारांवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर केलेल्या कारवाईमुळे गुन्हेगारांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झालेले असुन नागरीकांनी याबाबत समाधान व्यक्त करुन नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे कौतुक केले आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, नंदुरबार पी.आर.पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उप-अधीक्षक (मुख्यालय) विश्वास वळवी, उप विभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार सचिन हिरे, उप विभागीय पोलीस अधिकारी, शहादा श्रीकांत घुमरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व अमंलदार यांनी केलेली असुन पुढील काळात देखील ऑपरेशन ऑल आऊट (कोंबींग व नाकाबंदी) योजना संपुर्ण जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.









