Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कोरोनामुळे मृत्यु झालेल्यांच्या कुटूबांना पालिकेने कर माफीसह आर्थिक मदत करा : नंदुरबार शहर राष्ट्रवादीचे प्रभारी नगराध्यक्षांना मागणीचे निवेदन

team by team
December 10, 2021
in राजकीय
0
कोरोनामुळे मृत्यु झालेल्यांच्या कुटूबांना पालिकेने कर माफीसह आर्थिक मदत करा : नंदुरबार शहर राष्ट्रवादीचे प्रभारी नगराध्यक्षांना मागणीचे निवेदन

नंदूरबार l प्रतिनिधी

कोरोना महामारीत मृत्यु झालेल्यांच्या कुटूंबांना नंदुरबार नगर पालिकेतर्फे घरपट्टी, पाणीपट्टी व नगरपालिकेचे सर्व प्रकारचे कर माफ करुन त्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी नंदुरबार शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे करण्यात आली आहे. तसे निवेदन नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे युवानेते ॲड.राऊ मोरे व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नंदुरबार शहराध्यक्ष लल्ला मराठे यांनी पालिकेचे प्रभारी नगराध्यक्ष रवींद्र पवार यांना दिले.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, मागील पावणे दोन वर्षात कोरोनाच्या महामारीमुळे देशात मोठं नुकसान झालं आहे. अनेकांनी तर आपला कुटुंबप्रमुखच गमावला आहे. अशा कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. अशातच देशात सर्वत्र महागाईने जनता होरपळून निघाली आहे. अशा परिस्थितीत कोरोनामुळे मृत पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबाला उदरनिर्वाह व जीवन जगणे जिकरीचे झाले. काही कुटूबांतील कर्ते पुरुषच कोरोना महामारीला बळी पडल्यामुळे काही कुटूंब तर अक्षरशः रस्त्यावर आल्यासारखे झाले आहे.  त्यामुळे नंदुरबार नगरपालिकेने आपल्या स्तरावरुन अशा कुटूंबांप्रती सहानुभूतीपूर्वक विचार करुन अशा कुटूंबांना घरपट्टी, पाणीपट्टी व नगरपालिकेचे सर्व प्रकारचे कर माफ करुन त्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी नंदुरबार शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे करण्यात आली आहे. निवेदन देतेप्रसंगी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नाना माळी, सुरेश वळवी, कालु पहेलवान, प्रमोद महाजन, लाला बागवान, जयेश मोरे, अदनाम मेमन आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

समशेरपुर येथील आयान शुगरतर्फे ऊसाला 2350 रुपये प्रति टन दर जाहीर

Next Post

सारंगखेडा येथील अश्‍वबाजारात येण्यासाठी लसीकरण आवश्यक

Next Post
सारंगखेडा येथील अश्‍वबाजारात येण्यासाठी लसीकरण आवश्यक

सारंगखेडा येथील अश्‍वबाजारात येण्यासाठी लसीकरण आवश्यक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026
नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

June 28, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add