नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात दोन ठिकाणी असे सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट प्रसारीत करुन धार्मीक भावना दुखावतील व दोन जातिंमध्ये तेढ निर्माण होईल अशा पोस्ट प्रसारीत केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आहे.
सध्याच्या आधुनिक युगात लहान मुलांपासुन ते वयोवृध्द व्यक्ती ह्या सोशल मिडीयाचा वापर करतांना दिसुन येत आहेत . सोशल मिडीयाचा वापर करुन वेळेची बचत तसेच चांगले लेख व्हिडीओ प्रसारीत करुन चांगले संदेश देता येतात परंतु सोशल मिडीयावरुन काही लोक हे दोन धर्मात तेढ निर्माण होईल अशा आक्षेपार्ह पोस्ट , लेख लिहुन जातिय भावना भडकविण्याचा प्रयत्न करतात . म्हणुन सोशल मिडीया व इंटरनेटच्या माध्यमातुन पोस्ट करतांना सामाजिक भान ठेवाव व कोणतीही पोस्ट सोशल मिडीयावरुन ( फेसबुक , इंन्स्टाग्राम , व्टिटर व व्हॉट्सअॅप ) प्रसारीत करतांना ती पोस्ट आक्षेपार्ह आहे अगर कसे ? बाबत खात्री करुन मगच प्रसारीत करण्याची काळजी घ्यावी . आक्षेपार्ह पोस्टे प्रसारीत केल्यास त्या इसमाविरुध्द भारतीय दंड संहीता व माहीती तंत्रज्ञान अधिनियम २००० ( IT ACT २००० ) प्रमाणे कठोर कारवाई करण्यात येईल . याबाबत वारंवार नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तसेच सायबर सेल यांनी वृत्तपत्रातुन व सोशल मिडीयावरुन आवाहन देखील केलेले आहे . दि.६ डिसेंबर रोजी नंदुरबार जिल्ह्यात दोन ठिकाणी असे सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट प्रसारीत करुन धार्मीक भावना दुखावतील व दोन जातिंमध्ये तेढ निर्माण होईल अशा पोस्ट प्रसारीत केलेल्या दिसुन आल्याने त्याबाबत नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडुन आक्षेपार्ह पोस्ट प्रसारीत करणाऱ्या २ ईसमांवर २ वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत . तसेच त्यांचेवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे . , फेसबुक , इंन्स्टाग्राम , व्हॉट्सॲप, व्टिटरवर कोणत्याही प्रकारच्या आक्षेपार्ह पोस्ट दिसुन आल्यास तात्काळ सायबर सेल नंदुरबार ( 02564-210111 Ext 403 ) , नियंत्रण कक्ष नंदुरबार ( 02564-210113 ) यावर किंवा आपल्या नजिकच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधुन माहीती द्यावी . पोलीस अधीक्षक , नंदुरबार यांचेकडुन सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की , धार्मीक भावना भडकविणाऱ्या दोन जातिंमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या व खोट्या बातम्या प्रसारीत करणारे व्हिडीओ किंवा पोस्ट प्रसारीत करु नये . तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवु नये . आक्षेपार्ह व्हिडीओ , पोस्ट प्रसारित करतांना कोणीही आढळुन आल्यास त्याची माहीती त्वरीत वर नमुद संपर्क क्रमांकावर किंवा नजिकच्या पोलीस ठाण्यात देण्यात यावी .असे आवाहन पोलीस दल व सायबर सेलतर्फे करण्यात आले आहे.








