Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रत्येक ग्रामपंचायतीने ‘रोहयो’ची किमान पाच कामे शेल्फवर ठेवावीत, रोहयो अपर मुख्य सचिव नंदकुमार यांचे निर्देश

team by team
December 6, 2021
in कृषी
0
प्रत्येक ग्रामपंचायतीने ‘रोहयो’ची किमान पाच कामे शेल्फवर ठेवावीत, रोहयो अपर मुख्य सचिव नंदकुमार यांचे निर्देश

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातून मजुरांचे स्थलांतर थांबविण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीन किमान पाच कामे शेल्फवर ठेवतानाच किमान 500 मनुष्य दिवस कामांचे नियोजन करीत ते सुध्दा शेल्फवर ठेवावेत, असे निर्देश राज्याचे रोहयो, मृद व जलसंधारण विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. नंदकुमार यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात आज सकाळी रोहयो आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री. नंदकुमार बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, डॉ. मैनक घोष, ‘रोहयो’चे राज्य प्रशिक्षण समन्वयक नीलेश घुगे, मंत्रालयातील ‘रोहयो’चे अधीक्षक अभियंता राजेंद्र शहाडे, ठाणे प्रादेशिक जलसंधारण अधिकारी सुनिल काळे, ‘रोहयो’ राज्य प्रकल्प अधिकारी (एनआरएम) सायली घाणे, राज्य समन्वयक सामाजिक अंकेक्षण ज्ञानेश्वर सपाटे, विकास दांगट, नारायण देसले आदी उपस्थित होते.

अपर मुख्य सचिव श्री. नंदकुमार म्हणाले, नंदुरबार जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावयाची आहे. त्याचा या बैठकीच्या माध्यमातून आढावा घेण्यात येत आहे. रोजगार हमी योजनेची कामे सुरू झाल्यावर गावांतच रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मजुरांचे स्थलांतर थांबण्यास मदत होईल. कुपोषित बालके आढळून आल्यास त्यांच्या पालकांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून द्यावा. याबरोबरच शेती व शेतीशी निगडित कामे घेण्यास प्राधान्य द्यावे, अशाही सूचना श्री. नंदकुमार यांनी दिल्या.

यावेळी अपर मुख्य सचिव श्री. नंदकुमार यांनी सीपीएफअंतर्गत नियुक्त केलेले मनुष्यबळ, ग्रामपंचायत व निर्मित मनुष्यदिवस, निवड केलेल्या ग्रामपंचायतीवर झालेला खर्च, सन 2021-22 मध्ये घेण्यात आलेली कामे, सन 2021-22 लेबर बजेट अंमलबजावणी व साध्य, कुशल, अकुशल खर्च, यंत्रणानिहाय सुरु असलेल्या कामांचा तपशिल, शून्य खर्च असलेल्या ग्रामपंचायती आदींचा सविस्तर आढावा घेतला.

उपजिल्हाधिकारी शाहुराज मोरे (रोहयो) यांनी सादरीकरणाद्वारे नंदुरबार जिल्ह्यात सुरू असलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांची माहिती दिली. सीपीएफ योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांच्या माहितीचे सादरीकरण जिल्हा समन्वयक निखिल थोरात यांनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

खर्डा ते खटवळा रस्त्यावर जीपगाडीचा ब्रेक फेल होऊन गंभीर अपघात, १३ प्रवासी गंभीर जखमी

Next Post

महापरिनिर्वाण दिनानिमित्त जि.प.शाळेत विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला जय भीम चित्रपट

Next Post
महापरिनिर्वाण दिनानिमित्त जि.प.शाळेत विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला जय भीम चित्रपट

महापरिनिर्वाण दिनानिमित्त जि.प.शाळेत विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला जय भीम चित्रपट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add