नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार शहरातील हॉटेल राजदरबार जवळ गुरांची अवैधरित्या विना परवाना वाहतूक केल्याप्रकरणी संशयिताविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चार गोवंश जप्त करण्यात आले आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथील विशाल गुलाब कोळी हा त्याच्या ताब्यातील वाहनात गुरांना दाटीवाटीने बांधून अवैधरित्या विना परवाना वाहतूक करतांना शहरातील हॉटेल राजदरबार जवळ आढळून आला. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात चार गोवंश आढळून आली. याबाबत पोना.स्वप्निल शिरसाठ यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात विशाल कोळी याच्याविरोधात प्राण्यांना संरक्षण अधिनियम १९६० चे कलम ११ (ड) मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम ६६ चे उल्लंघन १९२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.स्वप्निल पगारे करीत आहेत.








