नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार शहरातील के.आर.सिटीमधून चोरट्याने मोटारसायकल लंपास केल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शंकरालाल कानाराम मेहरा यांच्या मालकीची दुचाकी (क्र.आर.जे.२३ एसपी ६६८०) चोरट्याने वाघोदा शिवारातील के.आर. सिटी प्लॉट क्र.२८ च्या घराच्या अंगणातून लंपास केली. याबाबत शंकरलाल मेहरा यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोेहेकॉ.पितांबर जगदाळे करीत आहेत.








